अमरावती : एकाच रात्री लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील तीन दुकानांना चोरट्याने लक्ष्य करून हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला, तर एक दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला. ही घटना विलासनगर चौकात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
याप्रकरणी लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील दुकान संचालकांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून कुलूप तोडून दुकानातील साहित्याची लंपास केले. विलासनगर रोड स्थित लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील जयदुर्गा प्राईड किचनचे शटर तोडून दोन कुकर चोरून नेले, कृषकराज इरिगेशनचे शटर तोडून गल्ल्यातील ६०० रुपये, न्यू गजानन ॲग्रोटेकचे शेटर तोडून गल्ल्यातील पैसे चोरले. तसेच चामुंडेश्वर तेल भांडार, ॲड प्रोव्हिजन तेल, पिपे व रोख लंपास केले. चोरी करताना एका दुकानात आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्याचे फुटेजही पोलिसांना तपासाकरिता देण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार आसाराम चोरमले करीत आहेत.
बॉक्स:
आरोपी मद्यप्राशन करतात
लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे दुकाने बंद झाल्यानंतर काही टवाळखोर तरुणांनी येथे दारूचा अड्डा बनविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर तरुण रात्रीच्या सुमारास येथे येऊन दारू ढोसतात. गतवर्षी येथे जलाराम सीट कव्हरचे दुकानाला आग लावून जळाले होते. तसेच मोसीकॉस कंपाऊंकडून चार ते पाच वेळा अज्ञाताने आगी लावल्या. यात वागरिंग जळाल्याचे तक्रारीत नमूद आहे.