शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:20 AM

पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे.

ठळक मुद्देआठवणींना उजाळा - वायुसेनेत अमरावतीची कामगिरी

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे. वायुसेनेसह अन्य सर्व सैन्यात जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील हजारो जवान कार्यरत आहेत, तर जिल्ह्यातील तीन सैनिकांना वीरचक्राने गौरविण्यात आले होते.१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने हल्ला चढविल्याने भारतीय सेनेतील ४२ जवान शहीद झाले होते. तदनंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजता वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे बारा तळ उद्ध्वस्त केले. भारत-चीन, भारत-पाकिस्तानमध्ये १९६२, १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या युद्धासह कारगिल युद्धात अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान आहे.तीन जवानांना वीरचक्रभारत-पाकिस्तान यांच्यातील युध्दात अमरावती जिल्ह्यातील जवानांची कामगिरी नेत्रदीपक आहे. सन १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात विंग कमांडर एस.एन. देशपांडे शहीद झाले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र देण्यात आले, तर १९७१ च्या भारत-पाक युद्धात वायुसेनेचे एअर कमांडर अरुणलाल देऊसकर यांना वीरचक्राने गौरविण्यात आले. सन १९४८ च्या भारत-पाक युद्धात शौर्य गाजविणारे सुभेदार पुंडलिक बकाराम बासुंदे यांना मरणोपरांत वीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते.युद्धमोहिमेत १७ जवान शहीदसन १९६२ च्या भारत- चीनच्या युद्धात मराठा रेजिमेंटचे शिपाई मुरलीधर कळसाईत, सन १९७१ मधील युद्धात शंकर सांगोले, नागालँड आंतरिक सुरक्षा मोहिमेत शिपाई रामराव गेठे, श्रीलंकेतील ‘आॅपरेशन पवन’मध्ये लॉन्सनायक किशोर खांडेकर, १९९५ मधील ‘आॅपरेशन रक्षक’मध्ये ओंकार मासोदकर, १९९५ मधील आंतरिक सुरक्षा मोहीम त्रिपुरामध्ये प्रभाकर म्हसांगे, आॅपरेशन कारगिलमध्ये कृष्णा समरित, सन २००७ च्या आॅपरेशन रक्षकमध्ये लान्स दफ्तेदार प्रकाश धांडे, आसामच्या उल्फा उग्रवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नायक सुनील चौहान, सन २००० मध्ये मणीलाल धांडे, १९६५ मधील भारत पाक युध्दात लान्सनायक गुलाबराव घडेकर व रावसाहेब मोहोड, अण्णासाहेब गोपाल राऊत व सुभेदार नत्थूजी खोब्रागडे व १९७१ च्या भारत पाक युद्धात विश्वनाथ वनवे असे १७ जवान शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या आॅपरेशन रक्षकमध्ये शिपाई पंजाबराव जानराव उईके शहीद झाले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला