लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आश्लेषा नक्षत्राच्या पाचव्या दिवशीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत धारणी तालुक्यात तब्बल १२५ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपुरातील सपन व मोर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या चारघड नदीला पूर आला. अतिवृष्टीमुळे धारणी तालुक्यातील पूल पाण्याखाली गेल्याने सुमारे ४० गावांचा संपर्क तुटला. ६८ दिवसांनंतर पावसाने गाठलेली सरासरी व संततधार पावसाने केलेल्या हॅट्ट्रिकमुळे सपन, चंद्रभागा, शहानूर या तीन मध्यम प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत. पूर्णा प्रकल्पातील जलसंचय वेगाने वाढत आहे. सलग अतिवृष्टीमुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. गावांच्या मधून जाणाºया नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे. प्र्रकल्पांची दारे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे
मेळघाटात ४० गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:28 AM
आश्लेषा नक्षत्राच्या पाचव्या दिवशीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत धारणी तालुक्यात तब्बल १२५ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपुरातील सपन व मोर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या चारघड नदीला पूर आला.
ठळक मुद्देसिपना, तापी, सापन, चारघडला पूर