परतवाडा (अमरावती) : मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यातील देडपाणीनजीक सोमवारी सकाळी ११.३० दरम्यान कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अचलपूर तालुक्यातील तीन युवक ठार झाले. अपघात करणारे चारचाकी वाहन मेळघाटातील एका शिक्षकाचे असून वृत्त लिहिस्तोवर शिक्षकाने अपघात होताच पळ काढण्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी 'लोकमत'शी बोलताना दिली
राज किशोर नागापुरे (वय २३ रा. येणी पांढरी ता. अचलपूर जि अमरावती), अंकुश सुरजलाल पारस्कर (वय ३२ रा.येणी पांढरी ता. अचलपूर जि. अमरावती), अमित भगवान ठाकूर (३२ रा.वडगाव फत्तेपूर ता. अचलपूर जि. अमरावती) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तिघेही मित्र सकाळी दुचाकीने चिखलदरा तालुक्यातील घटांग मार्गे काटकुंभकडे जात असताना कारने माखला मार्गावर देढपाणीजवळ त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील तिन्ही युवक दूरपर्यंत रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. जखमींना उपचारार्थ हलविण्यापूर्वीच दोघांनी घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच भैसदेही पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पवन कुमरे, पोलीस शिपाई विनोद आर, सैनिक दिनेश देवले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतकांचे छवविच्छेदन करण्यासाठी भैसदेही येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघात करून शिक्षक पसार
सदर अपघात (एम एच २७ बी व्ही ७९७८) क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने झाला. अपघात झाल्यावर कार चालकाने तेथून पळ काढण्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात मध्यप्रदेश पोलिसांजवळसुद्धा माहिती नव्हतीदोन युवक ऑटोचालक
तिन्ही युवक एका दुचाकीने अखेर कुठे जात होते या संदर्भात पोलीस माहिती घेत आहे. तर यातील दोन युवक परतवाडा व गावात ऑटो चालकाचा व्यवसाय करीत होते. पुढील तपास मध्य प्रदेश पोलीस करीत आहेमेळघाट मध्यप्रदेश मार्गावरून ये जा
मध्य प्रदेश सह मेळघाटच्या चिखलदरा तालुक्याच्या गावांना जाण्यासाठी या मार्गाचा वापर होतो तालुक्यातील घटांग नंतर पुन्हा मध्य प्रदेशच्या कुकरू खामला देडपाणी या गावांचा समावेश होतो त्यानंतर पुन्हा चिखलदरा तालुका काटकुंभ डोमा चोरणी अशी जवळपास ५२ आदिवासी पाडे आहेत. त्यामुळे येथून परिसरात येजा करण्यासाठी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरूनच ये जा करावी लागते.