अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : जंगलाचे वैभव, त्यातील थरार अनुभवण्यासाठी डोळसच असले पाहिजे असे नाही, जंगल हे डोळ्यात नव्हे, तर मनात साठविण्याची बाब आहे. अशाच ४१ दृष्टीबाधितांनी गुरुवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास जंगलात प्रवेश करून निसर्गाचा स्पर्श जाणून घेतला. वनविभागाने वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्यजीव, जंगल व पर्यावरण या घटकांमध्ये नागरिकांना सहभागी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्राधिकारी आशिष कोकाटे यांनी पोहरा-चिरोडी, वरूडा वनक्षेत्राचे वैभव, त्यातील वन्यजीव वातावरण पक्षी, झाडे याची माहिती करून देण्यासाठी अमरावतीच्या अंध विद्यालयातील दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना जंगल अनुभवण्याचे निमंत्रण दिले आणि या सर्व बाधितांनी डोळे नसले म्हणून काय तर आम्ही मनाने ते जंगल, त्यातील स्पर्श, आवाज मनाने बघू अशा भावनेने ही जंगल सफारी केली. वनविभागाने सुद्धा डोळे बनून त्यांना जंगल दाखविण्याचे कर्तव्य बजावले. वन्यजीव प्रेमी यादव तरटे यांनी दृष्टी बाधितांना वाद्य, पक्ष्यांचा आवाज काढून व माहिती दाखविली. वाºयाची झुळूक, गारवा, पक्ष्यांचा किलबिलाट, पहाटेची जंगलातील गार हवा आणि गवताचा स्पर्श करीत जंगलाची पायवाट सैर केली.जंगल कसे असते, हे डोळ्याने बघता येत नसल्याची खंत चेहºयावर न येऊ देता या सर्वांनी इतरांना लाजवेल अशा पद्धतीने जंगलातील घडामोडी जाणून घेतल्या. आम्ही डोळ्यांनी नव्हे, तर मनात ते साठविल्याची चुणूक त्यांनी दाखविली. हा भावस्पर्श उपक्रम मात्र डोळस असणाºयांच्या मनाला स्पर्श करून गेला. या अभिनव उपक्रमात चिरोडीचे वनपाल मधुकर निर्मळ, सतीश नाईक, अभिजित बगळे, गोविंद पवार, विधळे, कथलकर, राजन हिवराळे, वनमजूर शालिक पवार, राजू चव्हाण, शेख रफीक, बिसू पठाण, वाहन चालक पंचभाई यासह डॉ.नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी मोलाचे सहकार्य केले.
दृष्टी बाधितांनी अनुभवला जंगलाचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 9:47 PM
जंगलाचे वैभव, त्यातील थरार अनुभवण्यासाठी डोळसच असले पाहिजे असे नाही, जंगल हे डोळ्यात नव्हे, तर मनात साठविण्याची बाब आहे.
ठळक मुद्देपोहरा-चिरोडीची सैर : वन्यजीव सप्ताहात अभिनव उपक्रम