शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2016 12:06 AM

सोसाट्याचा वारा, आसमंतात धुळीचे लोट, आकाशात ढगांची गर्दी आणि काही कळण्याच्या आतच बरसू लागलेला पाऊस.

शहरातील वीज गूल : झाडे उन्मळली, होर्डिंग्ज उडाले, वाहनांची हानीअमरावती : सोसाट्याचा वारा, आसमंतात धुळीचे लोट, आकाशात ढगांची गर्दी आणि काही कळण्याच्या आतच बरसू लागलेला पाऊस. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अवघ्या १५ मिनिटे कोसळलेल्या पावसाने शहरात शेकडो झाडे उन्मळून पडली. होर्डिंग्ज-बॅनर उडाले, झाडांखाली वाहने दबली. मान्सूनपूर्व पावसाचा चांगलाच तडाखा रविवारी शहराला बसला. अवघ्या १५ मिनिटांच्या चक्रीवादळानंतर शहरातील बहुतांश भागातील वीज गूल झाली होती. या प्रकारानंतर महापालिकेतील आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाली आहे. शहरातील मोहननगर, अप्पर वर्धा वसाहत, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, श्रीकृष्णपेठ, रविनगर, राधानगर, पार्वतीनगर, महालक्ष्मीनगर, शंकरनगर, नवाथेनगर ते गोेपालनगर मार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली होती. रस्त्यातील खांबावर लावलेले होर्डिंग्ज आणि बॅनरदेखील उडालेत. शहरात १५ मिनिटे वादळाचे धूमशानअमरावती : अनेक कच्च्या घरांवरील टिनपत्री उडाली. फक्त १५ मिनिटेच पाऊस आणि वादळाचा हा धुमाकूळ सुरू होता. गर्ल्स हायस्कूलच्या आवारातील पुरातन वृक्ष देखील या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडला. तसेच तेथील चौकातील भव्यदिव्य बॅनर फाटले. राधा नगरातील एका स्कुलच्या आवारात शाळकरी व्हॅनवर वृक्ष कोसळले. त्यामध्ये व्हॅनचे नुकसान झाले. बाबा रेस्टारंटजवळील लोखंडी फ्लॅक्स कोसळले, त्यापुढे भातकुली पंचायत समितीच्या कुंपण भिंतीला लागून असलेला विशाल वृक्ष देखील कोसळला. हे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतूक बाधित झाली होती. विद्युत भवन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरही निमवृक्ष कोसळले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरातील वृक्ष देखील मार्गात आडवा पडला. पोलीस मुख्यालयाच्या मैदानाच्या शेजारचा पोलीस आयुक्तालयाकडे जाणारा मार्गदेखील झाडे उन्मळून पडल्याने अवरूध्द झाला होता. तेथीलच सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाचे टिने उडाली आहे. वादळामुळे विद्युत तारा तुटल्याने शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. वलगाव मार्गावरील शादी हॉलचे छप्पर वादळामुळे उडाले. त्याखाली एक चारचाकी वाहन व आॅटोेरिक्षा दबली होती. याखेरीज राधानगर भागामध्ये एका झाडाखील कार दबली होती. हाजरा नगरातील एमएसईबीची डीबी जमिनदोस्त झाली. चक्रीवादळामुळे उपोषण मंडळ उडाले.त्यामुळे उपोषण कर्त्यांची तारांबळ उडालीआणखी तीन दिवस वादळी पाऊसमागील चार दिवसांत तापमानात वाढ झाल्याने कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. या परिसिथतीमुळे वादळी पावसाचा फटका जिल्ह्याला बसल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिला. आणखी तीन दिवस हिच स्थिती राहणार असून तापमान वाढीसोबत वादळी पावसाचा फटका सोसावा लागू शकतो. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रावर हवेचा दाब मध्यम आहे. या परिस्थितीत मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल आसून सध्या मान्सून श्रीलंकेचज्या दक्षिण किनाऱ्यावर पोहोचला आहे. ७ जून पर्यंत तो केरळ किनारपट्टी आणि १४ किंवा १५ जूनपर्यंत विदर्भात पोहोचणे अपेक्षित आहे. सध्या केरळवर मान्सूनच्या ढगांची गर्दी असून चक्राकार वारे आहेत.आपातकालीन यंत्रणा सक्रियमहापालिकेची आपातकालीन यंत्रणा वादळाने सक्रिय झाली आहे. सायंकाळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु झाली होती. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरातील शेकडो वृक्ष कोसळलीत, त्यासाठी अग्निशमन विभागाने चार पथके तयार केली. उद्यान अधिक्षक प्रमोद येवतीकर व अग्निशमन अधिक्षक भरतसिंग चव्हाण यांच्या नेत्तृत्वात २० ते २५ कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी धाव घेऊन मदतीचे कार्य सुरु केले. बडनेरा उपनगरालाही वादळी पावसाचा तडाखा बसला. काही वेळासाठी येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर होर्डिंग्ज आणि बॅनर उडाले. काही घरांवरील टिनपत्रे देखील उडाली. झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.विद्युत प्रवाहाच्या झटक्याने युवकाचा मृत्यूबडनेरा : वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने उडालेली टिने पुन्हा घरावर लावत असताना विद्युत प्रवाहाच्या झटक्याने एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास बडनेरा जुनी वस्तीतील पवारवाडीत घडली. आकाश रामेश्वर खडेकर (२०) असे मृताचे नाव आहे. आकाशने उडालेली टिनपत्रे गोळा करून पुन्हा लावण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, दरम्यान वीजपुरवठा अचानक सुरू झाल्याने त्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसला.