वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीमान्सून विदर्भ ओंलाडून मध्यप्रदेशतपर्यंत पोहोचल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. सध्याच्या परिस्थितीनुसार बुधवारी विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडणार असून गुरुवार ते रविवारपर्यंत सर्वत्र मध्यम व धुंवाधार पाऊस पडण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र, मान्सूनचा धुंवाधार पाऊस अद्यापपर्यंत न पडल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. काही दिवसांत बऱ्यापैकी पाऊस पडण्याचे संकेत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. पश्चिम उत्तरप्रदेश, हरियाणा, बंगालचा उपसागर, आंध्रप्रदेश किनारपट्टी आणि उत्तराखंड, झारखंड व बिहारावरील हवेच्या वरच्या थरावर (दीड किमीवर) चक्राकार वारे आहेत. तसेच उत्तरप्रदेश, राज्यस्थान आणि सभोवताल तीन किमी अंतरावरही चक्राकार वारे आहेत. राजस्थान ते ओरिसा व पूर्व बिहार ते दक्षिण ओरिसावर द्रोणीय स्थिती आहे. ही स्थिती पाऊस पडण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे १६ व १७ जून रोजी विदर्भात हलका पाऊस तर १८ ते २० जूनदरम्यान सर्वत्र मध्यम ते धुंवाधार पाऊस पडण्याचे संकेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिले आहेत. उन्ह, ढग व पावसाचा खेळपावसाळा सुरु झाल्यापासून जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडत आहे. दिवसा उन्ह, ढग व पावसाचा खेळ सुरु असल्याने उकाडा निर्माण होत आहे. विदर्भवासी मान्सूनची प्रतीक्षेत आहेत. १३ जून रोजी मान्सून विदर्भात पोहोचला व मध्यप्रदेशात गेल्याचा अंदाज आहे.
गुरूवार ते रविवार मेघधारा बरसणार जोरदार
By admin | Published: June 17, 2015 12:35 AM