शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

विदर्भात बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय; वाघांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:40 AM

व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करणारी मध्यप्रदेशातील बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे व्याघ्र प्रकल्पांना अतिदक्षतेचा इशारा पाणवठ्यांवर निगराणी

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करणारी मध्यप्रदेशातील बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: पाणवठ्यांवर वनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’ची सूचना असून, व्याघ्र संरक्षण दलाची सीमेवर गस्त वाढविली आहे.विदर्भाला लागून असलेल्या कटनी, शिवनी, छिंदवाडा व बैतुल भागात बहेलिया टोळीचे वास्तव्य आहे. या टोळीचे कनेक्शन मेळघाट, पेंच, नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्पांशी असल्याने येथील वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी या प्रकल्पांवर आहे. विदर्भात वाघांच्या तस्करीत सक्रिय असलेला या टोळीचा प्रमुख सूत्राधार कट्टू यास नागपूर पोलीस आणि वनविभागाने अटक केली होती. नागपूर लगतच्या व्याघ्र प्रकल्पात आठ वाघांची शिकार करून कातडी दिल्लीकडे रवाना केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली होती. शिकार केलेले वाघ हे नवेगाव बांध, नागझिरा, उमरेड कऱ्हांडला येथील असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. दरम्यान, टोळीच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली होती. या टोळीचा कणा मोडलेला असताना, पुन्हा तप्त उन्हाची संधी साधून टोळीचे सदस्य विदर्भात सक्रिय झाले आहेत.मेळघाट, पेंच, नवेगाव व्याघ्र प्रकल्प लक्ष्यबहेलिया टोळीने वाघांच्या शिकारीसाठी नव्याने उभारी घेतली आहे. भैसदेही, बैतुल, बऱ्हानपूर, खंडवा असा मार्गक्रमण करून ही टोळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लक्ष्य करणार आहे. तर पेंच, नवेगाव बांध, उमरेड कऱ्हांडला गाठण्यासाठी कटनी, छिंदवाडा, जबलपूर असा मार्ग निवडला असल्याचे पोलिसांच्या गोपनीय अहवालातून वनविभागाला संकेत मिळाले आहेत.सोशल मीडियावरून मिळते वाघांच्या स्थळांची माहितीएनजीओंच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघांचे छायाचित्र व्हायरल होत असते. ही बाब बहेलिया टोळीसाठी फायद्याची ठरत आहे. सोशल मीडियावर वाघांचे छायाचित्र येताच तो कोणत्या व्याघ्र प्रकल्पातील आहे, याचा शिकाऱ्यांना अंदाज येतो. त्यानुसार ही टोळी वाघांचे स्थळ, पाणवठ्याचे लोकेशन मिळविण्यात यशस्वी होत आहे. व्याघ्र प्रकल्पातील कोअर एरियाच्या माहितीसाठी स्थानिकांना आमिष दाखविण्याचा फंडाही ते वापरत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’बाबत वरिष्ठांच्या सूचना नाहीत. मात्र, उन्हामुळे जंगलात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. पाणी प्रश्नदेखील गंभीर होत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वन्यजिवांच्या संरक्षणासंदर्भात दक्षतेच्या मौखिक सूचना दिल्या आहेत.- सुनील लिमये, अपर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर.

टॅग्स :Tigerवाघ