गणेश वासनिक अमरावती : वाघांची वाढती संख्या आणि वाघांना जंगलात मुक्तसंचार करता यावा, यासाठी विदर्भात आठ जिल्ह्यांमध्ये जंगलात ‘कनेक्टिव्हिटी’ निर्माण करून वाघांना मुक्त श्वास घता यावा या दृष्टीने ‘कॅरिडोर’ निर्माण करण्याचे विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने वनविभागाने केंद्र सरकारच्या ‘एनटीसीए’कडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे.राज्यात एकूण ६ व्याघ्र प्रकल्प असून मेळघाट, पेंच, बोर, नवेगाव - नागझिरा, ताडोबा असे ५ व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. तसेही विदर्भात वाघांच्या संख्येने १७५ पेक्षा अधिक आकडा पार केल्याचे नुकतेच झालेल्या व्याघ्र गणनेवरून स्पष्ट होत आहे. कळमेश्वर, काटोल, उमरेड - कºहांडला, टिपेश्वर, राळेगाव या भागातसुद्धा १५ ते २० च्यावर स्थलांतरित वाघ आढळून आले आहे. त्यामुळे वाघांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने कॅमेरा ट्रॅप, कॉलर, आयडी, फोटोग्राफ अशा विविध पद्धतीने वाघांचे ‘मॅनेटरिंग’ केले जाते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबासहीत इतर तालुक्यांमध्ये वाघांची संख्या वाढल्यामुळे या जिल्ह्यात वाघांना मुक्त संचारसाठी वनक्षेत्र कमी पडू लागले आहे. त्यामुळे वाघांचे संरक्षण, संवर्धनाच्या अनुषंगाने उमरेड, कºहांडला, चिमूर पुढे नवेगाव, नागझिरा, रामटेक, पेंच, कळमेश्वर, काटोल, कोंढाळी आणि बोर अशा पद्धतीने जंगलाची संलग्नता करण्याचा प्रस्ताव वनविभाग केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. हा कॅरिडोर ताडोबापासून प्रारंभ आणि बोरमध्ये समाप्त करण्याच्या दृष्टीने वनविभागाने सूक्ष्म अभ्यास केला आहे. मात्र, हा कॅरिडर निर्माण करीत असताना राष्टÑीय महामार्ग, राज्य महामार्ग, रेल्वे, वाहतूक रस्ते आदींचा विचार करणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी जंगलाची संलग्नता ठेवण्यासाठी बोगदा ही पद्धत आत्मसात केली जाणार आहे.
कॅरिडोरचे मॉपिंगविदर्भातील वाघांना वाढीव जंगल मिळावे, यासाठी चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा असे कॅरिडोर निर्माण करताना कॅरिडोरचे मॉपिंग केले जाणार आहे. कॅरिडोर निर्माण करताना वाघांना ये-जा करताना येणाºया मानव अडचणीचा विचार करून सीमेनुसार संलग्न जंगलाची तपासणी केली जाणार आहे.
मेळघाटला जोडणे अशक्यविदर्भातील ५ पैकी ४ व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांसाठी कॅरिडोर निर्माण करताना केवळ रस्त्यांची आडकाठी येणार आहे. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या एका टोकावर असल्याने आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत वसल्याने नागपूर जिल्ह्यातून मेळघाट व्याघ्र प्रकल्प असा वाघांचा मार्ग निर्माण होऊ शकत नाही. परंतु, बोर प्रकल्पातून पोहरा-चिरोडी राखीव वनक्षेत्रापर्यंत कॅरिडोर’ होण्याची शक्यता आहे.
संरक्षित वनक्षेत्राव्यतिरिक्त वाघांचे संरक्षण, संवर्धन करणे हे आव्हान आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पांना जंगलाशी जोडण्यासाठी ‘कॅरिडोर’ निर्माण करता आल्यास ते वाघांच्या संरक्षणासाठी पूरक ठरेल. राज्य शासनाच्या मान्यतेनंतरच तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर