लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वरूड तालुक्यातील करवार, एकलविहीर या लिंगा वनवर्तुळातील शिवारात वाघांचे वास्तव्य असल्याच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. पाणवठ्यावर पाणी पिताना, बांबूच्या झाडीत बसलेल्या अवस्थेत तीन वाघ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बंदिस्त झाले आहेत.जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी नागरी वस्तीकडे येऊ नयेत, यासाठी एकलविहीर, लिंगा वर्तुळामध्ये पाच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. या पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पहाटे, दुपारी आणि सायंकाळी या पाणवठ्यावर पाणी पिण्याकरिता आलेली नर-मादी व एक बछडा वनविभागाच्या कॅमेऱ्याने चित्रीत केला. या जंगलात पाच ते सहा वाघ व काही बिबट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. लिंगा वनवर्तुळामध्ये अस्वली, सांबर, निलगायी, हरिण, रानडुकरे असे वन्यप्राणी असल्याने या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून जंगलात जाणाºया रस्त्यावर नाकाबंदी करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.पाणवठ्यालगत लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात नर व मादी असे दोन वाघ व एक बछडा बंदिस्त झाला आहे. ग्रामस्थांनी सजग राहून वनविभागास सहकार्य करावे.- प्रशांत लांबाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरुड
सातपुड्याच्या कुशीतील लिंगा, करवार, एकलविहीर पंचक्रोशीत वाघांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 9:50 PM
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वरूड तालुक्यातील करवार, एकलविहीर या लिंगा वनवर्तुळातील शिवारात वाघांचे वास्तव्य असल्याच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत.
ठळक मुद्देअनेकांना घडले दर्शन ट्रॅप कॅमेरात बंदिस्त