शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
3
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
4
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
5
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
6
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
7
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
8
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
9
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
10
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
11
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
12
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
13
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
14
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
15
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
16
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
17
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
18
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
19
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
20
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला

देशात वाघ वाढले; पण...; विदर्भातील वाघ कंबोडियात जाणार!

By गणेश वासनिक | Published: April 16, 2023 4:28 PM

देशात १९७३ मध्ये ९ व्याघ्र प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात मेळघाट व ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होता. 

अमरावती : व्याघ्र गणनेत देशभरात वाघांची संख्या ३१६७ झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंद संचारलेला आहे. यात व्याघ्र प्रकल्पांचा सिंहाचा वाटा असला तरी अपुरे पडणारे जंगल आणि वाघांची कॉरिडॉरमुळे घुसमट वाढली आहे.भारतातील व्याघ्र प्रकल्पांना मोठी ताकद देण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. देशात १९७३ मध्ये ९ व्याघ्र प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रात मेळघाट व ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होता. 

आजमितीस देशात ४२ च्यावर व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. देशातील जंगलामध्ये वाघांच्या संरक्षणात व्याघ्र प्रकल्पांचा मोठा वाटा मानला जातो. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण हे व्याघ्र प्रकल्पांवर मॉनिटरिंग करते. या प्राधिकरणाची दिल्ली येथे २००५ मध्ये स्थापना झाली असली तरी कमी कालावधीत या प्राधिकरणाने वाघांच्या संख्येत वाढ करण्याची किमया केली आहे. किंबहुना वाघ तस्करीच्या बेहलिया टोळीचा बीमोड झाल्याने पूर्व भारतात वाघांची संख्या अलीकडे वाढल्याचे वास्तव आहे.

वाघ कसे वाढले?जगात बेंगाल टायगर म्हणून भारतातील वाघांना अधिक महत्त्व आहे. जगभरातील १७ देशांमध्ये वाघांचे ५ ते १० टक्के अस्तित्व असून, जगभरातील वाघांच्या टक्केवारीचा विचार केल्यास एकट्या भारतात ७५ टक्के एवढी संख्या वाघांची आहे. देशात दर चार वर्षांनी ३०० ते ५०० वाघ वाढले. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यात १५० ते २५० वाघांची वाढ आहे.

वाघांचे मृत्यूही तेवढेचगत चार वर्षांत मध्य प्रदेश, महाराष्ट्रात किमान २०० वाघ विविध कारणांनी मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत वाघ मृत्युमुखी पडले आहेत. काही वाघ विजेचा धक्का लागून ठार झाले आहेत. त्यामुळे वाघांची संख्या पुन्हा कमी होणार नाही, याची काळजी घेणे काळाची गरज आहे.

कंबोडियात वाघ जाणारविदर्भात मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या २५५ च्यावर आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव असा संघर्ष गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाला आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील १० ते १२ वाघ हे कंबोडियात हलविले जाणार असून याबाबतचा करार भारत आणि कंबोडिया सरकारमध्ये झाल्याची माहिती आहे. मात्र, वाघ केव्हा पाठविणार, हे निश्चित झाले नाही. एकेकाळी कंबोडियात मोठ्या प्रमाणात वाघ होते. तथापि, शिकारींमुळे या ठिकाणी वाघ संपल्यागत आहे. भारतातून २५ पेक्षा जास्त वाघ कंबोडियात टप्प्याटप्प्याने जाणार असल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही वाघ अन्य ठिकाणी हलविण्याबाबतचा सर्व्हे झाला आहे. केंद्र सरकारच्या एनटीसीए याबाबतची कार्यवाही करणार आहे. मात्र वाघ नेमके कुठे पाठविणार यासंदर्भात तूर्तास निश्चित झाले नाही.- सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्यमंत्री

व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या आकडेवारीवर एक नजर...वर्षे                  संख्या- २००६           १४११- २०१०         १७०६- २०१४         २२२६- २०१८       २९६७- २०२२         ३१६७

टॅग्स :Tigerवाघ