शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

‘आयएमए’कडून आरोग्य विभागाला टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 10:59 PM

डासांची उत्पत्ती रोखणे, नियंत्रणात आणण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. लोकसहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही, यासह अन्य महत्त्वाच्या टिप्स आयएमएसह अन्य संघटनांद्वारा महापालिका आरोग्य विभागाला देण्यात आल्या.

ठळक मुद्देकीटकजन्य आजारांचा आढावा : पीडीएमसीचे डीन, बालरोग संघटनांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डासांची उत्पत्ती रोखणे, नियंत्रणात आणण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. लोकसहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही, यासह अन्य महत्त्वाच्या टिप्स आयएमएसह अन्य संघटनांद्वारा महापालिका आरोग्य विभागाला देण्यात आल्या.राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकुनगुन्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक विषयावर महापालिकेत आढावा सभा घेण्यात आली. सभेला उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त योगेश पिठे, पंजाबराव देशमुख महाविद्यालयाचे डीन पद्माकर सोमवंशी, आय.एम.ए.चे अध्यक्ष अशोक लांडे, डॉ. विलास जाधव, बालरोग संघटना अध्यक्ष दिनेश बारब्दे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बाबर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, सहायक आयुक्त तौसिफ काझी व अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी विक्रांत राजुरकर यांनी मार्गदर्शन केले.साथरोग नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी डेंग्यू तापाच्या उद्रेकाच्या ठिकाणी दैनंदिन सर्वेक्षण, दैनंदिन सर्वेक्षणांतर्गत ताप रुग्णांचे रक्तनमुने तपासून हिवताप नसल्याची खात्री करणे, ताप रुग्णांना उपचार, निवडक ताप रुग्णांचे रक्तजल नमुने गोळा करून राज्यातील ३७ सेंटीनल सेंटर्सपैकी जवळील सेंटरला अथवा राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे परीक्षणासाठी पाठविणे, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, घरातील व परिसरातील पाणी साठ्यातील डास अळी घनतेची पाहणी, डास अळ्या आढळून आलेली भांडी रिकामी करणे, जी भांडी रिकामी करता येत नाहीत अशा ठिकाणी टेमिफॉस (अबेट) या अळीनाशकाचा वापर करणे, जीवशास्त्रीय उपाययोजनेंतर्गत डासोत्पत्ती डासअळी भक्षक गप्पीमासे सोडणे, उद्रेकग्रस्त ठिकाणी घरोघर कीटकनाशकांची धूर फवारणी करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.शासकीय प्रयत्नांसोबत नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचेनागरिकांनी आठवड्यातून किमान एकदा कोरडा दिवस पाळणे, घरातील पाणी साठ्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून घासून पुसून कोरडी करणे, घराच्या परिसरातील किंवा छतावरील टाकाऊ, निरुपयोगी वस्तू नष्ट करणे, डासांपासून व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी मच्छरदानीचा वापर, डास प्रतिरोध क्रिमचा वापर, शरीर पूर्ण झाकेल, असे कपडे घालणे, घर व परिसर स्वच्छ ठेवावा. डेंग्यूताप नियंत्रणासाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच जनतेचे सक्रिय सहकार्य अत्यंत आवश्यक आहे, असे या सभेत सांगण्यात आले.