महापालिकेत आढावा बैठक: रमाई घरकूल योजना आॅनलाईनचा शुभारंभअमरावती : आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेचा कारभार रुळावर आणण्यासाठी शनिवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी बांधकाम परवानगी, एफएसआय, संकुलांची निर्मिती, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासह शाळांचा खासगी तत्त्वावर विकास, उद्याने, चौकांचे सांैदर्यीकरण आदी बाबींना महत्त्व देत आर्थिक उत्पन्न वाढीसाठीच्या त्यांनी टिप्स दिल्यात. इमारतींना नियमित केल्यास सुमारे १०० कोटी रुपये उत्पन्न तिजोरीत जमा होईल, अशा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान पालकमंत्र्याच्या हस्ते रमाई आवास योजनेचा आॅनलाईन शुभारंभ करण्यात आला. आढावा बैठकीला महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त अरुण डोंगरे, पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, अजय गोंडाणे, प्रदीप दंदे, भूषण बनसोड, प्रदीप हिवसे, दिनेश बूब, हमीद शद्दा, उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील, किरण पातुरकर, सुरेंद्र कांबळे, छाया अंबाडकर, नरेंद्र वानखडे, महेश देशमुख, अशोक देशमुख, ज्ञानेंद्र मेश्राम, अशोक देशमुख, प्रमोद येवतीकर, शामसुंदर सोनी, सुषमा मकेश्वर, योगेश पीठे, देवेंद्र गुल्हाणे, वंदना गुल्हाणे, अरुणा डांगे, प्रवीण पाटील, प्रमोद कुळकर्णी, सुनील पकडे, सचिन बोंद्रे, भूषण पुसतकर आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी आयुक्त अरुण डोंगरे यांनी प्रास्ताविकातून वस्तूस्थिती मांडली यावेळी विलास इंगोले यांनी शासनाकडून विशेष अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली. या प्रमुख मुद्यांवर टाकला प्रकाशराजापेठ उड्डाण पुलासह अन्य उड्डाण पुलांना अॅप्रोच मार्गझोपडपट्टीमुक्त शहर, १९९५ पुर्विच्या झोपडपट्ट्या कायम करणे.अनाधिकृत बांधकाम नियमित करणे.फाईलींचा प्रवास जलद गतीने करणे.प्रकाश व्यवस्था सुसज्ज करण्यासाठी पीपीओ प्रणाली
उत्पन्नवाढीसाठी पालकमंत्र्यांनी दिल्या टिप्स
By admin | Published: April 05, 2015 12:35 AM