शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

तूर केंद्रांचा पुन्हा दगा

By admin | Published: June 13, 2017 12:07 AM

बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही केंद्राने मुदतवाढ दिलेली नाही.

मुदतवाढ नाही : टोकन दिलेली चार लाख क्ंिवटल खरेदी बाकीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत १० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर अद्यापही केंद्राने मुदतवाढ दिलेली नाही. शासनाने पुन्हा दगा दिल्याने टोकन दिलेल्या किमान १९ हजार शेतकऱ्यांची चार लाख क्विंटल तुरीची खरेदी व्हायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.जिल्ह्यात १० मे पासून पीएसएस योजनेव्दारा तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या कोट्याची तूर २६ मे रोजी पूर्ण झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील सर्व तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आली. त्यामुळे विहीत कालावधीत राज्य शासनाव्दारा बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात आली. बाजार समित्यांच्या आवारात उघड्यावर परंतु टोकन देण्यात आलेल्या तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र ही मुदतदेखील १० जून रोजी संपल्याने ज्या केंद्रावर तूर खरेदी व मोजणी बाकी होती त्या तुरीची प्रथम खरेदी करण्यात आली. सोमवारपर्यंत ही बाकी राहिलेली तूर खरेदी करण्यात आल्यानंतर यंत्रणा असलेल्या डीएमओव्दारा सर्व केंद्रावरील तुरीचा हिशेब जुळवणूक करण्यात येत आहे. तसेच केंद्रावरील तूर गोदामात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र टोकन दिलेल्या १९ हजार शेतकऱ्यांच्या चार लाख क्विंटल तुरीच्या खरेदीविषयी कोणतेच आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे खरिपाच्या पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.सर्व केंद्रावर ३१ मे पर्यत नोंद झालेल्या तुरीची खरेदी करण्यात आली.सध्या हिशोब प्रक्रीया सुरू आहे.टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी शासनादेशाची प्रतीक्षा सुरू आहे. - अशोक देशमुख,जिल्हा मार्केटींग अधिकारी