शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

तंत्रज्ञानाअभावी संत्रा उत्पादकांची पिछेहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:14 AM

वरुड-मोर्शी तालुक्याच्या भरभराटीला कारणीभूत ठरलेले संत्र्याचे पीक साठवणुकीसाठी शीतगृहे, प्रक्रिया केंद्र, संशोधन केंद्र व मार्गदर्शनाचा अभाव यामुळे आता फायदेशीर नसल्याचा अनुभव व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रक्रिया उद्योगाची आवश्यकता : वातावरणाचा बदल, पाण्याचे दुर्भिक्ष्य मुळावर

वीरेंद्रकुमार जोगी ।आॅनलाईन लोकमतअमरावती : वरुड-मोर्शी तालुक्याच्या भरभराटीला कारणीभूत ठरलेले संत्र्याचे पीक साठवणुकीसाठी शीतगृहे, प्रक्रिया केंद्र, संशोधन केंद्र व मार्गदर्शनाचा अभाव यामुळे आता फायदेशीर नसल्याचा अनुभव व्यक्त होत आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनदेखील उत्पादकांची पिछेहाट होत आहे.वरूड-मोर्शी तालुक्यात सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहराचे उत्पादन घेतले जाते. एकट्या वरूड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा आहेत. त्यापैकी १६ हजार हेक्टरमध्ये फळ देणारी झाडे आहे. यामुळे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. तथापि, वातावरणबदलामुळे रोगांचे वाढते प्रमाण व पाण्याचे दुर्भिक्ष्य या समस्या संत्रा उत्पादकांपुढे उभे ठाकले आहेत. ही स्थिती यापुढे कायम राहिल्यास उत्पादक अन्य पिकाकडे वळतील, असे मत व्यक्त होत आहे.प्रयत्न पडले अपुरेसन १९४५ पासून संत्र्याची लागवड सुरू झाली. १९६० साली शेंदूरजनाघाट येथे जिल्हा फळ बागायतदार रस उत्पादक सहकारी संस्थेच्या प्रकल्पाची कोनशिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी रोवली. पाच वर्षांत फॅक्टरी कर्जबाजारी झाली. १९९२ साली वरूडमध्ये ‘सोपॅक’ फॅक्टरी लागली, तर १९९५ साली मोर्शी तालुक्यात मायवाडी यथे ‘नोगा’ प्रकल्प उभारला. हे दोन्ही प्रकल्प बंद पडले.व्यापाऱ्यांची मक्तेदारी कायमदेशी-परदेशी बाजारपेठांमध्ये संत्र्याला मागणी मोठी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यामुळे संपूर्ण देशातून व्यापारी येथे ठाण मांडून संत्राबागा खरेदी करतात. बागायतदारांकडे पर्याय नसल्याने व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे. प्रक्रिया उद्योगाशिवाय यामध्ये फारसा बदल होणार नाही, असे मत बागायतदार व्यक्त करीत आहेत.