लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : क्रांतिदिनाच्या गनिमी कावा आंदोलनाला अद्याप तीन दिवस बाकी असताना गनिमी कावा पद्धतीचा वापर करून काही तरुणांनी सोमवारी रात्री उशिरा थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टायर जाळून 'एक मराठा-लाख मराठा' अशा घोषणा दिल्या नि पोलीस पोहोचण्यापूर्वी तेथून पलायनही केले.मेगाभरतीला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यंमत्र्यांनी केल्यावरही मराठा आंदोलकांवर त्याचा परिणाम झाल्याचे सोमवारी शहरात दिसून आले नाही. क्रांती दिन जवळ येत असतानाच आंदोनलांमधील तीव्रताही वाढत असल्याचे चित्र आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात जाळपोळ करणारे तरुण कोण होते, याबाबतची माहिती गाडगेनगरचे प्रभारी पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी आणि पोलीस आयुक्त संजय बाविस्कर हे उशिरा रात्रीपर्यंत मिळविण्याचा प्रयत्न करीत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रात्री जाळले टायर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:50 PM
क्रांतिदिनाच्या गनिमी कावा आंदोलनाला अद्याप तीन दिवस बाकी असताना गनिमी कावा पद्धतीचा वापर करून काही तरुणांनी सोमवारी रात्री उशिरा थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टायर जाळून 'एक मराठा-लाख मराठा' अशा घोषणा दिल्या नि पोलीस पोहोचण्यापूर्वी तेथून पलायनही केले.
ठळक मुद्देगनिमी कावा : तरुणांची घोषणाबाजी, नंतर पलायन