शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

तिवसा, धामणगाव, चांदूर रेल्वे पंचायत समित्यांवर १५ तारखेपासून असणार प्रशासकराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:02 IST

निवडणुका लांबणीवर : सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकांचा ताबा

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : धामणगाव तालुक्यासाठी चांदूर रेल्वे व तिवसा तालुक्याचे विभाजन करण्यात आले. तेव्हापासून या तिन्ही तालुक्यांत पंचायत समित्यांच्या निवडणुका इतर पंचायत समित्यांसोबत न होता स्वतंत्रपणे होत आहेत. या तीनही पंचायत समित्यांचा कार्यकाळ १४ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. अद्याप प्रभागरचना, आरक्षण सोडत न झाल्याने या पंचायत समित्यांवर डिसेंबरपासून १५ प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. 

विद्यमान बीडीओ हेच पंचायत समितीचे प्रशासक राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. जिल्हा परिषदेचा कार्यकाल २० मार्च २०२२ पासून संपुष्टात आलेला आहे, तर चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, अमरावती अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली व नांदगाव पंचायत समितीचा कार्यकाळही १३ मार्च २०२२ पासून संपुष्टात आला आहे. तेथेदेखील प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचे मुद्द्यावर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या पं. स.ची प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया आटोपली असतानाही आयोगाद्वारे निवडणूक कार्यक्रम लावण्यात आला नाही. परिणामी जिल्हा परिषदेसह ११ पंचायत समिती, मनपा व सर्व नगर परिषद व नगरपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित तीन पंचायत समित्यांमध्ये लोकनियुक्त पदाधिकारी होते. आता या ठिकाणीदेखील प्रशासकराज राहणार आहे. 

प्रभागरचना, आरक्षण सोडत झालेली नाही तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीची मुदत १४ डिसेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. मात्र या तिन्ही तालुक्यांत आयोगाद्वारे ही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पंचायत समित्यांच्या निवडणुका न होता प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

एकत्रित निवडणूक होण्याची दाट शक्यता जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५९ वरून ६६ पर्यंत करण्यात आल्याने पंचायत समितीची सदस्यसंख्या ११८ वरून १३२ झालेली आहे. आता लवकरच निर्णय होऊन न्यायालयीन प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे जि.प. व सर्व पंचायत समिती व काही दिवसांच्या फरकात नगर परिषद, नगरपंचायत व मनपाची निवडणूक होण्याची शक्यता असल्याची चर्चा प्रशासनात आहे.

प्रशासकांमुळे विधानपरिषदेची निवडणूक रखडली विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा कार्यकाळ २२ जून २०२४ ला संपुष्टात आलेला आहे. या मतदारसंघात सन २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ४८८ मतदार होते. यंदा तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव पंचायत समिती वगळता सर्व स्थानिक संस्थांवर प्रशासक आहे. या सर्व ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत मतदार यादी होऊ शकत नाही. प्रशासकराजमुळे ही निवडणूक रखडली आहे. पं।स, चे फक्त सभापतीच यामध्ये मतदार आहेत.

या तारखेपासून प्रशासकराज जिल्हा परिषद : २० मार्च २०२२ १० पंचायत समिती : १३ मार्च २०२२ धारणी पंचायत समिती: २४ जून २०२२ तिवसा, चांदूर, धामणगाव : १४ डिसेंबर २०२४

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीdhamangaon-railway-acधामणगाव रेल्वेChandur Railwayचांदूर रेल्वेAmravatiअमरावती