लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनमुळे जीवनवाहिनी एसटी बसची चाके थांबली होती. दोन महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. मात्र, बडनेरा व अमरावती वगळता ग्रामीण भागातील इतर सहा आगारांतून शुक्रवारी सकाळपासून ६१ बस धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. यासंबंधी परिपत्रकही त्यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना जारी केले आहे.जिल्ह्यातील परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये व गावांमध्ये सदर बस धावतील. ६१ बसद्वारे दिवसभरात ५४७ बसफेऱ्यांच्या नियोजन करण्यात आले आहे. एकूण १९,२९७ किमीचा प्रवास त्या करतील. त्यामध्ये ११२ चालक व तेवढेच वाहक तैनात करण्यात आले आहेत. बसफेऱ्या सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दोन महिन्यानंतर अधिकृत प्रवासी साधने उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना प्रवास करावा लागणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.शहरातून बस बंदअमरावती व बडनेरा परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. महापालिकेचा हा परिसर रेड झोन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास दोन्ही आगार व शहरातून एसटी बस वाहतूक बंद राहणार आहे.
आजपासून ग्रामीण भागात धावणार ६१ बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM
जिल्ह्यातील परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये व गावांमध्ये सदर बस धावतील. ६१ बसद्वारे दिवसभरात ५४७ बसफेऱ्यांच्या नियोजन करण्यात आले आहे. एकूण १९,२९७ किमीचा प्रवास त्या करतील. त्यामध्ये ११२ चालक व तेवढेच वाहक तैनात करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून प्रवासी वाहतूक बंद : गरीब प्रवाशांना दिलासा