लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार, १४ एप्रिल रोजी येथील इर्विन चौकात भीमसागर उसळणार आहे. चौकाला गुरुवारी सायंकाळीच यात्रेचे स्वरूप आले.स्थानिक इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौदर्र्यींकरण समितीच्यावतीने अभिवादनास येणाऱ्या अनुयायांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. एकता रॅली आयोजन समितीतर्फे अभिवादन कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर समाजसेवक पुरस्कार वितरण होईल. गुरूवारी सायंकाळी बॉम्ब शोधक- नाशक पथकाने पुतळा परिसर पिंजून काढला. दरम्यान, शुक्रवारी रात्री १२ वाजता रिपाइं (गवई) च्यावतीने सरचिटणीस राजेंद्र गवई, कीर्ती अर्जुन आदींच्या उपस्थितीत १२७ किलो वजनाचा केक कापला जाणार आहे.१४ एप्रिलला पोलिसांचा बंदोबस्त, मार्गातही बदलअमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील ८० टक्के पोलीस १४ एप्रिल रोजी बंदोबस्ताला राहणार आहे. यादरम्यान इर्विनकडून जाणाºया वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शहरात प्रत्येक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्या अनुषंगाने सर्व कार्यक्रम शांततेत पार पडावे, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लागला आहे. गुन्हेगार व रेकॉर्डवरील आरोपींची धरपकड होत आहे. सोबत छेडखानी निर्मूलन पथक सज्ज करण्यात आले आहे.
इर्विन चौकात आज भीमसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:34 PM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार, १४ एप्रिल रोजी येथील इर्विन चौकात भीमसागर उसळणार आहे. चौकाला गुरुवारी सायंकाळीच यात्रेचे स्वरूप आले.
ठळक मुद्दे१२७ वी जयंती : गुरुवारी सायंकाळपासूनच यात्रेचे स्वरूप