शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आज सावंग्यात जळणार लाखोंचा कापूर!

By admin | Published: April 08, 2016 12:14 AM

नजीकच्या सावंगा विठोेबा येथील श्री कृष्णाजी महाराजांच्या दर्शनाचा मुहूर्त गुढीपाडव्याचाच असल्याने शुक्रवार ८ एप्रिल रोजी राज्यभरातून लाखो भक्तांची गर्दी येथे उसळणार आहे.

प्रभाकर भगोले चांदूररेल्वेनजीकच्या सावंगा विठोेबा येथील श्री कृष्णाजी महाराजांच्या दर्शनाचा मुहूर्त गुढीपाडव्याचाच असल्याने शुक्रवार ८ एप्रिल रोजी राज्यभरातून लाखो भक्तांची गर्दी येथे उसळणार आहे. प्रथेनुसार येथे लाखोंचा कापूर जाळणार आहे. गुढीपाडव्याला या छोट्याशा गावाला आगळे महत्त्व प्राप्त होते. कृष्णाजी पर्यटन स्थळाच्या काठावर सावंगा विठोबा येथे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी कृष्णाजी महाराजांनी समाधी घेतली आहे. तेव्हापासून हे स्थळ तीर्थक्षेत्र बनले आहे. या यात्रेत उज्ज्वल भविष्याच्या कामनेसाठी लाखो भाविक येतात. येथे गुढीपाडव्याला लाखो रूपयांच्या कापुराची विक्री होते. श्री कृष्णाजी महाराज मंदिरासमोर ७२ फूट लांबीचे दोन खांब आहेत. या खांबावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत नवीन खोळ चढविण्याचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. अवधूत महाराजांच्या ओव्या भक्तांना तोंडपाठ असून त्यांच्या वाणीतून शब्दबध्द करून विश्वस्तांनी त्या ओव्यांचा संग्रह प्रसिध्द केला आहे. गुढीपाडव्याला व एरवीही या या संस्थानात लाखो भाविक येत असल्याने दानपेटीत गोळा झालेल्या रकमेतून येथे भक्तनिवास बांधण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील संस्थानने येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. भक्तांना सावंगा येथे ये-जा करणे सोपे व्हावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाला यात्रेकरिता प्रासंगिक बसेस सोडण्याच्या सूचनादेखील विश्वस्तांनी केल्या आहेत. गुढीपाडव्याला या यात्रेचे विशेष महत्त्व असल्याने सर्वसामान्य नागरिक मिळेल त्या वाहनांनी सावंगा विठोबा येथे जातील. येथे यात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात्रेसाठी गोविंद राठोड, हरिदास सोनवाल, वामन रामटेके, दिनकर मानकर, अनिल बेलसेर, रूपसिंग राठोड, दिगंबर राठोड, दत्तुजी रामटेके, विनायक पाटीील, कृपासागर राऊत, पुंजाराम नेमाडे, बबनराव चौधरी आदी प्रयत्नरत आहेत.