मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : भगवान श्रीराम लंकाविजय मिळवून अयोध्येला परत येत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्वलित केलेले लाखो दिवे अशा विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाला लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे़बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता़ त्या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामनरूप धारण करून बळीराजाला तीन पाय टाकण्याएवढ्या भूमीचे दान मागितले़ विष्णूने तीन पायांनी त्रैलोक्य घेतले़ प्रसन्न झालेल्या विष्णूने बळीराजाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी केली जाईल, असा वर दिला.लक्ष्मी अश्विन अमावस्येच्या रात्री सर्वच घरी संचार करून आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान या दिवशी शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा, व रसिकता आढळते, तिथे ती स्थानापन्न होते. याशिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, सयंमी व क्षमाशील पुरुष आणि गुणवत्ता व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात, त्या घरी लक्ष्मी वास करते. त्यामुळे घर लख्ख करणारी नवीन केरसुणी घराबाहेर उजव्या बाजूस कुकंवाने स्वास्तिक काढून त्यावर दांडा वर करून ठेवण्यात येतो़ लक्ष्मीपूजनाच्या अगोदर तिने झाडत आणतात जुनी केरसुणी उंबरठ्यावर आडवी ठेवून तिचा एक फड तोडून बाहेर फेकला जातो. अशी अलक्ष्मी नि:सारण विधी घराघरांत दिवाळीनिमित्त करण्यात येतो. ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे....म्हणून साजरी करतात दिवाळीदिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता़ यामुळे आनंदित झालेल्या गोकुळवासीयांनी दुसºया दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता़ इ़स़ २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती, तर जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता़ महावीर सवंत त्याच्या दुसºया दिवशी सुरू होते़ त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात़ प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे़
आज लक्ष्मी, कुबेर अन् नव्या केरसुणीची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:17 PM