शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

आज लक्ष्मी, कुबेर, नव्या केरसुणीची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 10:20 PM

श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परत येताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्ज्वलित केलेले लाखो दिवे; अशी विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे.

ठळक मुद्देलोकमत दिवाळी विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार/धामणगाव रेल्वे : श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परत येताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्ज्वलित केलेले लाखो दिवे; अशी विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे.दिवाळी हा सण अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया या सहा दिवसांच्या कालावधीत साजरा करण्यात येतो. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य दिले. भूलोकवासी त्याच्या आठवणीप्रीत्यर्थ प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले. दिवाळीचा हा आणखी एक संदर्भ आहे.दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदित झालेल्या गोकुळवासीयांनी दुसऱ्या दिवशी अमावस्येला दीपोत्सव केला.२५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांचा स्वागतसाठी लाखो दिवे लावले होते. जैन धर्मा$चे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी महावीर संवत सुरू होते. त्यामुळे लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करताना चौरंग अथवा पाट घेऊन त्यावर लाल अथवा पिवळे वस्त्र टाकतात. त्यावर स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवतात.केरसुणीचे पूजनघरातील अस्वच्छता घालविणारी केरसुणी ही लक्ष्मीचे प्रतीक. त्यामुळे या केरसुणीचे पूजन लक्ष्मीपूजनानिमित्त करण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे. त्यासाठी दिवाळीच्या खरेदीत केरसुणीचा क्रमांक हा होताच. दिवाळीवा नव्याकोऱ्या केरसुणीचे पूजन केले जाते.