शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
3
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
4
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
5
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
6
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
7
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
8
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
9
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
10
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
11
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
12
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
13
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
15
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
16
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
17
"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत
18
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
19
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"नितीन गडकरी चांगले नेते, पण देवाभाऊ..."; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा

आज शाळांमध्ये प्रवेशोत्सव, विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

By admin | Published: June 27, 2017 12:04 AM

आजपासून शाळांची पहिली घंटा वाजणार असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

उत्साह : कुठे गुलाबपुष्प, कुठे रांगोळ्या, कुठे प्रभातफेरी लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आजपासून शाळांची पहिली घंटा वाजणार असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणिय ठरणार आहे. नवप्रवेशित बालकांना शाळेची गोडी लगावी, याउद्देशाने प्रत्येक शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षक व अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी शाळांना भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांची भरारी पथके तत्पर राहणार असून तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त केली जाणार आहेत. मोफत व सक्तीचे शिक्षणहक्क कायद्यानुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसह इयत्ता पहिली व चौथीच्या बालकांचे गोड पदार्थ भरवून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित प्राथमिक शाळांतील बालकांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाईल. मंगळवारी गावागावात प्रभातफेरीचे आयोजन करून तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तसेच त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाईल. शाळा परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविला जाणार आहे. पोषण आहारही गोड शाळेचा पहिला दिवस असल्याने पोषण आहारातील मेन्यूही गोड असणार आहे. यासंदर्भात सर्वच शाळांना शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत, ७ ते ७.३०-बालकांची प्रथम भेट, ८ ते ९ - पाठ्यपुस्तके वितरण, मान्यवरांच्या हस्ते बालकांचे स्वागत, ९ ते १०- वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. पाठ्यपुस्तकांचा पुरवठासर्वशिक्षा अभियानापासून शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व बालकांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. तसेच मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. दोन्ही गोष्टी एकत्रपणे देण्यात येतील.शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा, याउद्देशाने विशेष तयारी करण्यात आली आहे. रविवारपासून शाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जाईल. - एस.एम.पानझाडे प्राथमिक शिक्षणाधिकारी