विरोधकांकडे उमेदवारच नाही : भाजपचीच बल्ले बल्ले, तिवस्यात काँगे्रसचा उपसभापतीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अडीच वर्षाचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव पंचायत समिती सभापतींची निवडणूक १५ जून रोजी होत आहे. याच दिवशी उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. या तीनही पंचायत समितीमध्ये विरोधी पक्षाकडे सभापतीपदासाठी उमेदवार नाही. मात्र, भाजपकडे उमेदवार असल्याने त्यांचाच वरचष्मा राहणार आहे. संख्याबळावर तिवसा येथे काँॅग्रेसचा उपसभापती निवडून येईल.तिवसा पंचायत समितीत सभापतीपद हे एससीसाठी राखीव आहे. या प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने एससी. स्त्री राखीव प्रवर्गातील सदस्य अर्चना वेरूळकर यांना प्रवर्गात उभे राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी त्यांची अविरोध निवड होईल. सभागृहात काँॅगे्रसचे तीन व सेना, भाजपचा प्रत्येकी एक सदस्य असल्याने संख्याबळावर काँगे्रसचा उपसभापती निवडून येईल.चांदूररेल्वे पंस. सभापतीपद सर्वसामान्य स्त्री राखीव आहे. या प्रवर्गात देविका राठोड, निलीमा होले व छबू जाधव या सदस्य दावेदार आहे. हे तीनही उमेदवार भाजपाचेच असल्याने व सभागृहात भाजपचे बहुमत असल्याने सभापती व उपसभापतीपदी भाजपचे उमेदवार विजयी होतील, अशी दाट शक्यता आहे.धामणगाव पंस. सभापतीपद एससी स्त्री राखीव प्रवर्गासाठी आहे. मात्र या प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने ग्रामविकास विभागाला यासंदर्भात मार्गदर्शन मागितले आहे. त्यानुसार एससी प्रवर्गातील उमेदवार सचिन पाटील यांना या प्रवर्गात उभे राहता येईल. पाटील भाजपचेच सदस्य आहे. व सभागृहात भाजपचे बहुमत असल्याने धामणगाव रेल्वेत सभापती व उपसभापती या दोन्ही पदावर भाजप बाजी मारणार आहे.
तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव सभापतींची आज निवडणूक
By admin | Published: June 15, 2017 12:09 AM