पथक : आयुक्तांच्या दाव्याची खातरजमाअमरावती : मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील चार सदस्यीय समिती २ ते ४ मे दरम्यान शहर स्वच्छतेची तपासणी करणार आहे. शहर हागणदारीमुक्त केल्याचा आयुक्तांच्या दाव्याची खातरजमा करण्यासाठी ही चार सदस्यीय समिती सोमवारी सायंकाळी शहरात दाखल झाली. नगरविकास विभागाने २९ आॅक्टोबर २०१५ च्या निर्णयान्वये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारीमुक्त होणाऱ्या शहरांची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत केली आहे. आयुक्त आणि महापौरांच्या उपस्थितीत ३१ मार्चला संपूर्ण ४३ प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. त्याबाबत नगरविकास विभागाला कळविण्यात आले. त्यानुसार राज्यस्तरीय समिती शहराची प्रत्यक्ष पाहणी करेल व वैधतेचा अहवाल स्वच्छ भारत अभियान (नागरी) व नगरविकास विभागाच्या अवर सचिवांना सादर करेल. समितीत नागपुरचे जिल्हा प्रशासन अधिकारी राजेश भगत, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ सुहास चव्हाण, नितीन तारेकर आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. एसीबीची नजर!अमरावतीची पाहणी करून गेलेल्या घिमिरे आणि जोशी यांचा समावेश असलेल्या पथकाला औरंगाबाद येथे १ लाख ७० हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते. स्वच्छ सर्वेक्षणात चांगले गुण देण्यासाठी लाच स्वीकारताना एसीबीने तिघांना ताब्यात घेतले होते. या भ्रष्टाचारानंतर स्वच्छ सर्वेक्षणास येणाऱ्या पथकांवर महापालिकेने खर्च करू नये, असे निर्देश निघाले होते. त्या पार्श्वभूमिवर गुणांकन व तपासणीसाठी पथकाकडून लाचखोरी होत असल्याचा प्रकार राज्यात उघड झाला होता. त्या अनुषंगाने होणाऱ्या तपासणीवर ‘एसीबी’ची नजर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.यापूर्वीही झाली तपासणीदेशातील ५०० शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. २००० गुणांच्या या स्वच्छतेविषयक स्पर्धेमध्ये शहरांचे गुणांकन ठरविण्यासाठी एका खासगी कंपनीच्या ‘असेसर्स’कडून तपासणी करण्यात आली. त्याअनुषंगाने क्युसीआयने नेमलेल्या चारूदत्त पाठक, गोविंद घिमिरे आणि विजय जोशी यांनी १७ ते १९ जानेवारीदरम्यान स्वच्छता विषयक पाहणी केली.
शहर ‘ओडीएफ’ची आजपासून तपासणी
By admin | Published: May 02, 2017 12:41 AM