शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तीन पंचायत समितीच्या २० गणांसाठी आज मतदान

By admin | Published: November 22, 2014 10:52 PM

जिल्ह्यात तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितीमधील २० गणांसाठी रविवार २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे.

तिवसा/धामणगाव/चांदूररेल्वे : जिल्ह्यात तिवसा, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे पंचायत समितीमधील २० गणांसाठी रविवार २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ११३ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहे. महसूल वगळता निवडणूक प्रक्रियेतील १३०७ कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी मतदान केंद्राचा ताबा घेतला आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल.तिवसा पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३९ उमेदवार रिंंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार तिवसा गणात आहेत. तिवसा पंचायत समितीत तिवसा, वरखेड, मारडा, कुऱ्हा, मोझरी, व वऱ्हा या सहा गणांचा समावेश आहे. तिवसा येथे १५ हजार ७६९, वरखेड गणात १३ हजार ८८६, कुऱ्हा गणात १५ हजार ११७, मारडा गणात १४ हजार ११२, मोझरी गणात १४ हजार ५०७ व वऱ्हा गणात १३ हजार ७६६ असे एकूण ८७,१५७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीसाठी तालुक्यात १०३ मतदान केंद्र आहे. महसूल वगळता ४०७ कर्मचाऱ्यांनी शनिवारी मतदान केंद्रांचा ताबा घेतला. या निवडणुकीत १०३ मतदानयंत्रांचा वापर होईल. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. सोमवारी २४ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता येथील अप्पर वर्धा मनोरंजन सभागृहात मतमोजणी सुरु होईल. चांदूररेल्वे पंचायत समितीच्या सहा गणांसाठी ३७ उमेदवार भाग्य अजमावणार आहेत. घुईखेड, सातेफळ,आमला, पळसखेड, मालखेड व राजुरा या सहा गणांचा समावेश आहे. घुईखेड गणात ५ हजार ६४६ पुरुष तर ५ हजार २७४ महिला मतदार आहेत. निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.