शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

प्रसाधनगृह जागेचा तिढा सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:19 PM

शहरात वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहांसाठी काही ठिकाणी जागेचा अडथळा आलेला असल्याने ती रखडली आहेत. यासाठी महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रणय कुळकर्णी हे स्वच्छता विभागाशी संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या दोन महिण्यात तीन ठिकाणचे प्रसाधनगृह पुर्णत्वास जाणार असल्याने त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआयुक्तांकडून आढावा : दोन महिन्यांत तीन ठिकाणी होणार लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहांसाठी काही ठिकाणी जागेचा अडथळा आलेला असल्याने ती रखडली आहेत. यासाठी महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रणय कुळकर्णी हे स्वच्छता विभागाशी संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या दोन महिण्यात तीन ठिकाणचे प्रसाधनगृह पुर्णत्वास जाणार असल्याने त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल पीआयएल क्र. ९८/२०११ च्या निर्देशाने महापालिकेच्या हद्दीत वर्दळीच्या २७ ठिकाणी प्रसाधनगृहांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये मोठ्या बाजारपेठा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, प्रभागातील मुख्य रस्ते आदी गजबजलेल्या ठिकाणी या प्रसाधनगृहाची निर्मिती केल्या जाणार आहे. यामधील सहा ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी जागा अन्य विभागाच्या अखत्यारित असल्याने त्या ठिकाणी अडसर निर्माण झालेला आहे. हा तिढा सूटावा यासाठी सोमवारी महापालिका आयुक्त संजय निपाने यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यावेळी जागेअभावी रखडलेले प्रसाधनगृह व कंत्राटदाराचे देयके आदींविषयी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पीडीएमसी, महसूल विभागासह अन्य विभागाच्या जागेअभावी कामे रखडली असल्याने समिती सदस्य प्रणय कुळकर्णी या विभागाच्या भेटी घेऊन जागेचा प्रश्न निकाली काढणार आहे. काही ठिकाणी एनओसीमुळे कामे रखडली असल्याने महापालिकेचे सबंधित अभियंत्यांना याविषयीच्या सुचना बैठकीत देण्यात आल्यात. गाडगेबाबा समाधीच्या समोरील भागात असणार, प्रभात चौक व सक्करसाथ येथील प्रसाधनगृहाचे काम दीड महिण्यात पुर्णवास जाणार असल्याने लोकार्पण करण्यात येणार आहेत. दर १५ दिवासांनी समितीची बैठक आयोजित करून आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठकीला नगरसेविका निलिमा काळे, नगरसेवक प्रणय कुळकर्णी, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, श्रीकांत चव्हाण, निवेदिता घार्गे, प्रशांत शेळके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी अजय जाधव, शहर अभियंता रविंद्र पवार, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, उपअभियंता प्रमोद इंगोले यांची उपस्थिती होती.या ठिकाणी होणार प्रसाधनगृहनवसारी बसस्टॉप, गाडगेबाबा मंदिरासमोरिल जागा, पीडीएमसी, शेगाव चौक, कठोरा नाका, राजकमल चौकातील उड्डानपुलाखाली, अंबादेवी मार्ग, मालटेकडी रस्त्यावर, चित्रा चौक, इतवारा बाजार, प्रभात चौक, नगर वाचनालय, नमुना, राजापेठ शाळेजवळ, राजापेठ अंबानाला, पुज्य बाबा दरबार, सिटी कोतवाली समोर, महापालिका मुख्यालय, यशोदानगर, चपरासी पुरा, शुक्रवारी बाजार, दक्षिण प्रभाग कार्यालय, बडनेरा जुनीवस्ती दर्ग्याजवळ, नवाथे प्लॉट नाक्याजवळ, दस्तूर नगरात गोरक्षण जवळ, जवाहर गेट सराफा बाजार.सातत्याने हा विषय लावून धरला. त्यामुळे सहा ठिकाणची कामे पुर्णत्वास जात आहे. तीन ठिकाणी दोन महिन्यात लोकार्पण होईल. काही ठिकाणी जागेची अडचण असल्याने सबंधित विभागांची आपण स्वत: भेटी घेवू.- प्रणय कुळकर्णीस्वीकृत नगरसेवक