शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

घरी शौचालय, घाण मात्र गावाच्या वेशीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:30 AM

९९ टक्के कुटुंब लाभार्थी, हगणदरीला तिलांजली अमरावती : जिल्ह्यातील ४ लाख १७५ कुटुंबांपैकी ३ लाख ९५ हजार ५५८ ...

९९ टक्के कुटुंब लाभार्थी, हगणदरीला तिलांजली

अमरावती : जिल्ह्यातील ४ लाख १७५ कुटुंबांपैकी ३ लाख ९५ हजार ५५८ कुटुंबांनी शौचालय बांधले. जिल्हा ९९ शौचालययुक्त होऊनही गावाच्या वेशीवर दुर्गंधी पाहायला मिळत असून, हगणदरीमुक्त जिल्हा ही संकल्पना कागदावरच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून शौचालय वापराबाबत जनजागृती केली जाते. विशेष म्हणजे, बांधकामासाठीसुद्धा शासनाकडून अनुदान दिले जात असल्यामुळे आणि प्रशासनाने शासकीय सुविधांसाठी अट घातल्यामुळे नागरिकांनी शौचालय प्राधान्याने बांधले. तथापि, मेळघाटातील काही गावे तसेच इतरही तालुक्यांतील काही गावांना भेटी दिल्या असता, येथील गावाच्या वेशीवर दुर्गंधी पसरल्याचे दिसून आले. याबद्दल सामाजिक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, शासनाकडून शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन बांधकामे केली असताना, अनेक ग्रामस्थ शौचालय असूनही उघड्यावर शौचास जातात. त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पथकांची निर्मिती केली. जनजागृती केली. मात्र, अनेक गावांत उघड्यावर शौचास जाण्याचे चित्र आजही दिसून येते. परिणामी अनेक गावांच्या वेशीवर घाण आहे. याकरिता खबरदारीच्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

तालुकानिहाय बांधण्यात आलेली शौचालये

अमरावती २७५८३

अचलपूर ४०३५६

अंजनगाव २१०३६

भातकुली २१९७२

चांदूर बाजार ३७६८३

चांदूर रेल्वे १७७४०

चिखलदरा २२७०५

दर्यापूर ३४५७९

धामणगाव रेल्वे २५१४९

धारणी ३१११७

मोशी ३११६९

नांदगाव खंडेश्वर २५२९१

तिवसा २१६७७

वरूड ३८४२६

बॉक्स

जिल्ह्यात शाैचालय नसलेली कुटुंबे

४६१६

शौचालयाचे बांधकाम जिल्ह्यात प्रगतिपथावर

१०९९

बॉक्स

शाैचालयात जळतण

ग्रामीण भागात अनेक कुटुंबांनी शासकीय अनुदानातून शौचालयाचे बांधकाम केले. मात्र, अनेक कुटुंब या शाैचालयात विनावापराच्या वस्तू तसेच जळतण भरून ठेवत असल्याचेही चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, शौचालय असताना अनेक कुटुंब उघड्यावर शौचास जात असल्याचे वास्तव अनेक गावात पाहावयास मिळते.

कोट

गावांमध्ये घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहेत. त्याचा वापरही बरेच लोक करतात, तर काही जणांनी यामध्ये साहित्य भरून ठेवले आहे. काही जण बाथरूम म्हणूनही त्याचा वापर करीत आहेत.

चंद्रभान घोंगडे, नागरिक

कोट

गावामध्ये शंभर टक्के शौचालय बांधण्याचे प्रयत्न केले आहे. काही वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांकडे शौचालय नाही. त्यांनाही बांधण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याबाबत जनजागृती झाल्यामुळे लोक त्याचा बऱ्यापैकी वापर करीत आहेत.

प्रदीप गोमासे, माजी सरपंच, घोडगाव