अमरावती : रेवसा मार्गावरील श्री गुरू गजानन धाममध्ये संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता मुख्य सोहळ्याप्रसंगी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल.गजानन धाम परिसरातच २१ जानेवारी २०१८ रोजी श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा पार पडला. या ठिकाणी उभारलेल्या मंदिरात रविवारी सकाळी ७.३० वाजता भक्त परिवारकडून सोहळ्याला प्रारंभ होईल. याप्रसंगी विद्या पडवळ, सुनील देशपांडे, शंकरराव महाजन, अमोल गडम यांचे प्रवचन होईल. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे प्रवचन व ज्ञानेश्वर मेश्राम यांचे कीर्तन होईल. सोमवारी गाथामूर्ती रामचंद्रबाबा बोधे महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण होईल. यानंतर संत मेळावा व संतांचा सत्कार पार पडेल. बाळाभाऊ कुळसंगे यांचे प्रवचन व ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे कीर्तन पार पडेल. मंगळवारी उत्तम महाराज बढे यांचे काल्याचे कीर्तन होईल, अशी माहिती संत गजानन महाराज भक्त परिवार महापारायण समितीने दिली.
उद्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आणि प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 10:56 PM
रेवसा मार्गावरील श्री गुरू गजानन धाममध्ये संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता मुख्य सोहळ्याप्रसंगी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल.
ठळक मुद्देसंत गजानन महाराज मंदिर : गजानन धाममध्ये तीन दिवसीय कार्यक्रम