अमरावती : आकाशात १ ऑगस्ट या पौर्णिमेच्या दिवशी सूपरमून दिसणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहील. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. पृथ्वी व चंद्रादरम्यान सरासरी अंतर हे ३.८५ लाख किमी असते. परंतू जेव्हा पृथ्वी व चंद्र यांचे अंतर ३.७० लाख किमीच्या आत असते, त्याला सूपरमून असे म्हटल्या जाते.चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंमीने लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेंकदाने मोठा होणार आहे. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहेत. पर्वत व विवरे हे दूर्बिनीने अगदी चांगल्या पद्धतीने पाहता येतात.
मंगळवारी संध्याकाळी दिसणारा सूपरमून खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी अवश्य पाहावा, अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, याच महिन्यात ३१ ऑगस्टला ब्यूमून व सूफरमून दिसणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.
पृथ्वीवरुन चंद्राचा ५९ टक्केचा भाग दिसतो.
चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती व ओहोटीची तिव्रता वाढणार आहे. याशिवाय वादळ आदी घटना घडू शकतात. पृथ्वीवरुन चंद्राचा आपण नेहमी चंद्राचा ५९ टक्केच भाग पाहतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेंकद लागत असल्याची माहिती विजय गिरुळकर यांनी दिली.