लेहेगाव : केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावर लेहेगाव ग्रामपंचायतीने मोहोर उमटविली. अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयात २४ एप्रिल रोजी पंचायत दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ अविश्यांत पंडा यांच्या हस्ते सरपंच राजेंद्र तट्टे व ग्रामसेविका व्ही. एस. प्रतिके यांना प्रदान करण्यात आला. ग्रामपंचायत लेहेगाव येथे वृक्षसंवर्धन, स्वच्छता, शिक्षण सौरऊर्जेवर भर दिला. संरपच राजेंद्र तट्टे, बाजार समितीचे संचालक संजय तट्टे, धनंजय तट्टे, माजी जि. प. सदस्य विद्या तट्टे यांच्या मार्गदर्शनात हा पुरस्कार प्राप्त झाला. ग्रामपंचायतीला मिळालेल्या पुरस्काराकरिता खंडविकास अधिकारी पवार, विस्तार अधिकारी सुपले, भिवगडे, प्रवीण तट्टे, उपसरपंच सरस्वता तंतरपाळे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत तट्टे, रमन पानशे, संध्या दुगाणे, चंद्रकला गोरे यांनी परिश्रम घेतले.
लेहेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:12 AM