फोटो पी ०३ लेहेगाव फोेल्डर
लेहेगाव : केंन्द्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावर लेहेगाव ग्रामपंचायतीने आपली मोहर उमटविली आहे. ही ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.
ग्रामपंचायत लेहेगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविताना प्रशासकीय नियम व अटीचे पालन करत गावकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गावात वृक्षसंवर्धन व स्वच्छता, शिक्षण, सौरऊर्जेवर भर देण्यात आला. सरपंच राजेंद्र तट्टे, ग्रामसेविका व्ही.एस. प्रतिके, मोर्शी कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय तट्टे, डॉ. धनंजय तट्टे यांच्या मार्गदर्शनात हा पुरस्कार प्राप्त करता आला. लेहेगाव ग्रामपंचायतीला मिळालेला पुरस्काराकरिता माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या तट्टे, गटविकास अधिकारी पवार, विस्तार अधिकारी सुपळे, विस्तार अधिकारी भिवगडे, ग्रा.पं.कर्मचारी प्रवीण तट्टे, रमेश लोमटे, श्रीकांत गजभिये, प्रशांत मनोहरे, सरस्वती तंतरपाळे, रणजीत तट्टे, ग्रा.पं.सदस्य संध्या दुगाणे, चंद्रकांत गोरे यांनी कष्ट घेतले.
-----------------