अमरावती जिल्हय़ाचा निकाल ९0.७३ टक्के : विभागात ९९ हजार २८६ विद्यार्थी उर्तीर्ण
अमरावती
: महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील रसिका मुळे ही जिल्हातून अव्वल ठरली आहे. बियाणी महाविद्यालाचा निकाल ९९.0४ टक्के लागला असून यंदाही या महाविद्यालयाने टक्केवारीत बाजी मारली आहे. या निकालामध्ये ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाने सर्वाधिक टक्केवारीची पंरपरा यंदाही कायम ठेवली आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयातील ११ विद्यार्थी टॉपर असताना यंदा २६ विद्यार्थ्यांनी गुणवंत्तेमध्ये उच्चांक गाठला आहे.मागील वर्षी स्वतीक नगरातील रहीवासी रसीका राजेश मुळे हीने १0 वीच्या परीक्षेत ९८.१८ टक्के घेवून जिल्हात दुसरा क्रमांक पटकाविला होता.यावर्षी तीने बारावीमध्ये ९६ टक्के घेवून बहुमान मिळविला आहे.शहरातील अन्य महाविद्यालयातही निकालाची टक्केवारी अधिक प्रमाणात दिसुन आली आहे. भारतीय
महाविद्यालयात विज्ञान शाखेचा निकाल ९९ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून गौरव अग्रवाल याने ९२.७६ टक्के गुण मिळविले. शशांक जाजू ९0.१५ टक्के, मल्हार तिडके ८९.५३ व शिवमकुमार नथानी याने ८९.५३ टक्के गुण प्राप्त केल्याची माहिती प्राचार्य ए.जे. गादेवार यांनी दिली. त्याच प्रमाणे सर्मथ कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून तुषार सुनील देशपांडे ९४.४६, प्राची सुनील जोशी ९३.0७, पवन दीपक पोहेकर ८७.८४, प्रणित गिरेंद्र खंडार ८३.0७ व निश्चल प्रकाश चिंचोळकर या विद्यार्थ्याने ८३.0७ टक्के गुण मिळविले. ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी यशाची पंरपरा गाठतच आहे. गेल्या वर्षात ११ विद्यार्थी गुणवंत होते तर यावर्षी सुध्दा २६ विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांतुन महाविद्यालयाचे नाव उंच केले आहे. माझ्या कारर्गीदीतील हा शेवटचा निकाल असुन मला समाधान आहे.यापुढेही कॉलेज प्रगतीची वाटचाल करेलच.अश्या प्रतिक्रिया ब्रिजलाल बियाणी कॉलेजचे प्राचार्य एस.बी.लोहीया यांनी दिल्या.