लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन वर्षांपासून भाषा, सामाजिकशास्त्र, गणित व विज्ञान या विषय शिक्षकांचा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यामुळे या विषयांच्या सखोल अभ्यासापासून विद्यार्थी वंचित आहेत. सन २०१६ पासून या तिन्ही विषयांच्या कार्यरत शैक्षणिक पात्रतेच्या शिक्षकांना पदोन्नती मिळालेली नाही. काही शिक्षक मेळघाटात सेवा द्यावी लागत असल्याने पदोन्नती घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव आहे.मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये भाषा विषयाचे ४७, सामाजिकशास्त्र विषयाचे १६, तर गणित व विज्ञान विषयांसाठी आवश्यक ९७ शिक्षक नसल्याने अन्य शिक्षकांवर ते विषय शिकविण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना यामुळे गती लाभलेली नाही. विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक नुकसानाला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कारणीभूत असल्याची ओरड होत आहे. सामाजिकशास्त्र, गणित व विज्ञान या तीन विषय शिकविण्यसाठी जी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, ती पात्रता असलेले असलेले अनेक शिक्षक मेळघाटात कार्यरत आहेत. परंतु, शिक्षण विभागाने सन २०१६ पासून त्या शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदोन्नती दिली नाही.मेळघाटात विज्ञान शिक्षकांची ९७ पदे रिक्तविद्यमान युग हे विज्ञानाचे युग आहे. सर्वत्र माहिती व तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारले आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाच्या अध्ययनापासून दूर ठेवले आहे. विज्ञान व गणित विषयाच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत ८२ व चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत १५ अशा ९७ जागा रिक्त आहेत. भाषा विषयाच्या ४७ व सामाजिकशास्त्र विषयाच्या १६ जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे विषय शिक्षकांचा प्रचंड अनुशेष आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय शिक्षकांचा अनुशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:37 AM
मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन वर्षांपासून भाषा, सामाजिकशास्त्र, गणित व विज्ञान या विषय शिक्षकांचा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यामुळे या विषयांच्या सखोल अभ्यासापासून विद्यार्थी वंचित आहेत. सन २०१६ पासून या तिन्ही विषयांच्या कार्यरत शैक्षणिक पात्रतेच्या शिक्षकांना पदोन्नती मिळालेली नाही.
ठळक मुद्देशिक्षणाचा बट्ट्याबोळ : तीन वर्षांपासून पदोन्नती नाही