लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराचे आकर्षण व जलक्रीडेसाठी प्रख्यात वडाळी तलावात सुविधा निर्माण करून पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी १५ वर्षांचा करारनामा कंत्राटदारांसोबत करण्यात येणार आहे. यासंदर्भात ४६.६५ लाखांची निविदा प्रक्रिया सध्या महापालिकेत सुरू आहे. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने बीओटी तत्त्वाचा अवलंब केला जाणार आहे.शहरातील वडाळी तलाव सौंदर्यीकरण, जलक्रीडा तथा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जलक्रीडा संकुल, पर्यटन विकास व इतर पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी १५ वर्षांच्या कराराने अनुभवी पर्यटन व्यावसायिकांकडून निविदाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शहरात या पर्यटनाला वाव असल्यामुळे तेथे उपलब्ध सुविधेत आणखी काही नाविण्यपूर्वक सुविधा तयार करण्यासाठी महापालिकेद्वारा प्रयत्न केले जात असल्याची माहिती उपायुक्त महेश देशमुख यांनी दिली.प्रत्यक्षात महापालिकेजवळ निधीचा अभाव असल्याने बीओटी तत्वावर या सुविधा निर्माण करून पर्यटकांना आर्कषीत करण्याचा प्रयास सुरू आहे. मात्र, आहे त्या सुविधेमध्ये पुन्हा करारनामा करण्याऐवजी या ठिकाणी आणखी काही नाविण्यपर्र्ण सुविधा निर्माण झाल्यास या ठिकाणी पर्यटनाला चांगलाच वाव आहे.महापालिकेत निधीचा अभाव असल्याने बिओटीच्या माध्यमातून आहे त्या परिस्थितीत कंत्राटदाराशी १५ वर्षाचा करार करण्यात येणार आहे. या विषयीची प्रक्रिया सधाया सुरु आहे.- प्रमोद देशमुख,कार्यकारी अभियंता, महापालिका
बीओटी तत्त्वावर वडाळीत पर्यटन सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:57 PM
शहराचे आकर्षण व जलक्रीडेसाठी प्रख्यात वडाळी तलावात सुविधा निर्माण करून पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी १५ वर्षांचा करारनामा कंत्राटदारांसोबत करण्यात येणार आहे. यासंदर्भात ४६.६५ लाखांची निविदा प्रक्रिया सध्या महापालिकेत सुरू आहे. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने बीओटी तत्त्वाचा अवलंब केला जाणार आहे.
ठळक मुद्दे१५ वर्षांचा करार : जलक्रीडेसाठी सुविधा निर्माण करणार