जितेंद्र दखने - अमरावतीकॉफीची नजाकत काही औरच. मग ती कोल्ड असो वा हॉट. कॉफीच्या शौकीनांची संख्या काही कमी नाही. वाफाळलेली कॉफी घेतांना ती कशी ब्लेड केली गेली, चिकोरी किती प्रमाणात आहे इथपासून तर कॉफीचा मळा फुलतो कसा, असे विविध प्रश्न उपस्थित होतात. यासाठी काही दर्दी या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी कॉफी उत्पादनाचा भाग पालथा घालतात. अशा हौसी पर्यटकांची संख्या कमी नाही. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात कॉफीचे उत्पादन होेते याची अनेकांना माहीती नाही. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कॉफी मळ्यांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देशात कॉफीचे उत्पादन मुख्यत्वे दक्षिण भागात होते. त्यातही कर्नाटकातील कूर्गचा भाग कॉफी उत्पादनासाठी ओळखला जातो. या बहुतांश मळ्यात कॉफीचा पेरा ब्रिटीशांच्या काळात झालाय. तामीळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यात परंपरागत कॉफीचे उत्पादन करणारे आहेत. चिखलदऱ्यातही ब्रिटीशांनीच ७० एकर परिसरात कॉफीचे मळे लावले. या कॉफीची चव हटके आहे. सातपुड्याच्या कुशीतील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. समुद्र्रसपाटीपासून तीन हजार ६०० फुट उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. चिखलदऱ्यात पर्यटकांसाठी सोयीचा अभाव आहे. रस्त्यांची दुरवस्था आहे. पर्यटकांची क्षमता असूनही दुर्लक्षित रहिलेल्या या स्थळाला कॉफीच्या माध्यमातून नवी ओळख देण्याचा प्रयत्न पर्यटन विकास महामंडळाने सुरु केला आहे. येथील कॉफीची युनिक आकडेवारी जपण्यासाठी पर्यटक महामंडळ या बाबतचा प्रस्ताव शासनाकडे देणार आहे. चिखलदरा परिसरातील संत्र्याच्या बागा आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना संत्र्याची झाडे बाजारपेठ आणि झाडावरची फळे तोडू खाण्याचे आकर्षण असते. पर्यटकांची ही उत्सुकता पूर्ण व्हावी यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे.
चिखलदऱ्यातील कॉफी मळे ठरणार पर्यटकांचे आकर्षण
By admin | Published: December 02, 2014 10:56 PM