शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

विदर्भातील पर्यटनस्थळे पुन्हा एकदा गजबजली, व्याघ्र दर्शनाने पर्यटक सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 2:48 AM

व्याघ्र दर्शनाने पर्यटक सुखावले

लॉकडाऊनमध्ये घरात थांबून कोंडमारा झालेली माणसं आता घरापासून दूर कुठेतरी भटकण्यासाठी आतुर झाली आहेत. ख्रिसमसपासून लोक फिरायला बाहेर पडत आहेत. थंड हवेची ठिकाणे व समुद्रकिनारे गर्दीने फुलले आहेत. त्याच वेळी महाराष्ट्रात वाघाच्या दर्शनाचे हक्काचे ठिकाण असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पातही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. अनलॉकनंतर विदर्भात फुललेल्या वन पर्यटनाचा घेतलेला हा आढावा...

ताडोबाची जंगल सफारी जोरातचंद्रपूर : कोराेनाच्या दहशतीने पर्यटस्थळे ओस पडली होती. आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटक पसंती देत आहेत. ताडोबाची ऑनलाइन बुकिंग फुल्ल असल्याचे बघायला मिळत आहे. अलीकडेच मुंबईतील अमेरिकी वकिलातीचे प्रमुख डेव्हिड रॅन्झ ताडोबात तीन दिवसांच्या मुक्कामाला होते. माया आणि तारा या वाघिणींच्या कुटुंबाने त्यांना भुरळ घातली. हमखास व्याघ्र दर्शन ही येथील खासियत आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला २० हजार पर्यटकांची भेटनरेंद्र जावरेचिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनासह विदर्भाचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदऱ्यात अनलॉकनंतर सव्वा लाख पर्यटकांनी हजेरी लावली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलात पर्यटकांची संख्या आता वीस हजारांपेक्षा अधिक झाली आहे. वाघासह बिबटे, रानगवे, सांबर, हरिण हे वन्यप्राणी मेळघाटच्या जंगलाची ओळख आहेत. चिखलदरा पर्यटनस्थळावरून वैराट व सेमाडोह या ठिकाणी जंगल सफारीसाठी जिप्सी वाहनांची व्यवस्था आहे. वैराट जंगल सफारीचे अंतर १७ किलोमीटर आहे. या परिसरात वाघासह इतर मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांचे दर्शन होते. 

आकर्षणाची केंद्रेताडोबात पर्यटकांसाठी व्याघ्र दर्शनासह ॲडव्हेंचर नेचर ट्रॅक, बर्ड वाॅचिंग, बटरफ्लाय गार्डन, सायकलिंग, डायरोमा, राफ्टिंग, बोटिंग, मचाण स्टे, लाँग हट स्टे ही आकर्षणाची केंद्रे आहेत. ज्यांना कोअरची सफारी करणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी बफर सफारीचाही पर्याय उपलब्ध आहे. बफरमध्येही व्याघ्र दर्शनाचा आनंद पर्यटक लुटत आहेत. नाइट सफारीही पर्यटकांना भुरळ घालत आहे.

हमखास व्याघ्र दर्शनn चिखलदरा व सेमाडोह येथे येणारे पर्यटक निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासोबतच सर्वाधिक अपेक्षा व्याघ्र दर्शनाची ठेवतात. n अनेक गावांचे पुनर्वसन झाल्याने, तेथे गवती कुरणक्षेत्र तयार झाले आहे. परिणामी, तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यातूनच व्याघ्र दर्शन पर्यटकांना होत आहे.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर