शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

नियमांची ऐशीतैशी; पर्यटक पोहोचले भीमकुंड धबधब्याजवळ, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:37 AM

या पर्यटनस्थळावरील पॉइंटवर विशिष्ट मर्यादेपलीकडे प्रवेश निषिद्ध असताना ते तेथे गेले कसे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे

नरेंद्र जावरे 

चिखलदरा (अमरावती) : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावर महाभारतकालीन भीमकुंड पॉईंटच्या ३५०० फूट खोल धबधब्यानजीक गुरुवारी सायंकाळी तीन पर्यटक गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. जिवाचा धोका असल्याने प्रवेश निषिद्ध असलेल्या अशा ठिकाणी जीवघेणे साहस करणाऱ्यांना आवरणार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

चिखलदरा पर्यटनस्थळावर पावसाळ्याच्या दिवसांत हजारो पर्यटक हजेरी लावत आहेत. अशात शेकडो फूट उंचावरून कोसळणाऱ्या भीमकुंडाच्या मुखाशी तीन पर्यटक पोहोचले. जिवाची कुठलीच पर्वा किंवा भीती बाळगण्याऐवजी ते तेथून हातवारे करीत होते. हा सर्व प्रकार भीमकुंडाच्या कठड्याशी असलेल्या पर्यटकांनी पाहताच आवाज लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. दरम्यान, या पर्यटनस्थळावरील पॉइंटवर विशिष्ट मर्यादेपलीकडे प्रवेश निषिद्ध असताना ते तेथे गेले कसे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

अनेकांनी गमावला जीव

चिखलदरा पर्यटनस्थळावरील भीमकुंड पॉईंटच्या दरीत काहींनी उडी घेत जीवन संपविलेे, तर काहींचा अपघाताने पाय घसरून जीव गेल्याचा प्रकार नवीन नाही. त्यामुळे वनविभागाच्या वतीने येथे प्रवेश निषेधाचे फलक लावण्यात आले आहे. परंतु, पर्यटक नियम मोडून जात असल्याचे गुरुवारी पुन्हा उघड झाले.

पोलिस, वनाधिकाऱ्यांची गस्त

मेळघाट वन्यजीव विभागाने हा संपूर्ण घटनाक्रम गांभीर्याने घेतला आहे. दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पंचबोल आणि भीमकुंड पॉईंटवर गस्त लावण्यात आली तसेच पोलिसांनासुद्धा तशा सूचना देत कारवाई केली जाणार असल्याचे मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी यशवंत बहाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

भीमकुंड येथील प्रकारासंदर्भात व्हिडीओ पाहिला. दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गस्त लावण्यात आली असून, पोलिसांनाही असा प्रकार करणाऱ्या पर्यटकांवर सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यटकांनी नियमांचे पालन करूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- यशवंत बहाडे, विभागीय वनअधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा

टॅग्स :environmentपर्यावरणMelghatमेळघाटtourismपर्यटनAmravatiअमरावती