लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: शनिवारी सकाळीच्या वेळेत नियमित प्रार्थनेनंतर शाळकरी विद्यार्थी वर्ग खोल्यात जाऊन बसले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवीणे सुरूच केले होते. दरम्यान शाळेच्या प्रागंणात लॉनवर पाणी घालताना शिपायाला एक लहानसा साप हळूच बाहेर फणा काढताना आढळला. त्यामुळे शिपायाची घाबरगुंडी झाली. मोर्शी रोडवरील गणेशदास राठी विद्यालयात घडलेला हा प्रसंग असून, शिक्षकामार्फत ही माहिती मिळताच वसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेत जाऊन सापाला रेस्क्यू केले. त्यावेळी तो साप विषारी कोब्रा प्रजातीचा असल्याचे आढळून आले. दररोज मधल्या सुट्टीत विद्यार्थी प्रागंणातील लॉनवर खेळतात. तत्पूर्वीच साप पकडण्यात आल्याने अनर्थ टळला. शिक्षकांनी थोडे धाडस दाखवून सापाच्या पिल्लावर उलटी बादली ठेवली आणि सापाची माहिती वसा संस्थेच्या हेल्पलाईन नंबरवर दिली. सर्पमित्र मुकेश वाघमारे आणि शुभम सायंके यांनी शाळेत पोहचून बकेटखाली झाकून ठेवला असलेला कोब्रा साप रेस्क्यू केला. सापाचे ते पिल्लू हे कोब्रा प्रजातीचे असून, त्याची लांबी ९ इंच होती सापाची नोंद करून त्याला दूर जंगलात सोडण्यात आले.साप निघाल्यास सर्पमित्राला बोलवापावसाळ्याच्या दिवसांत कुठेही साप निघू शकतात. अनेक सापांचा प्रजनन व अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याचा हाच काळ असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. साप निघाल्यास त्याला न मारता, वन विभागा ला किंवा सर्पमित्राला कळवावे.शिक्षकांचे प्रसंगावधान..शाळेत साप निघाल्याचे कळल्यावर सर्वच शिक्षक साप बघायला आले. काही कळण्याच्या आत मधल्या सुटी ची घंटा वाजली, विद्यार्थी वर्गा बाहेर येतील हे बघून लगेच एका शिक्षकाने प्लास्टिक बॅकेट सापावर उलटी करून ठेवली. आणि सर्पमित्र येईस्तोवर तिथेच थांबले.पावसाळ्यात साप निघणे साहजिक आहे. सापासाठी शहारातून दररोज ८ ते १४ कॉल्स येतात. नागरिकांनी सापाला न मारता सर्पमित्रांशी सपर्क साधावा.- मुकेश वाघमारे,सर्पमित्र, वसा संस्था
शाळेच्या आवारात विषारी कोब्रा सापाचे पिल्लू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:30 AM