फोटो - धीरेंद्र चाकोलकर नावाने मेलवर आहे.
--------------------------
मोर्शी : घनकचरा व्यवस्थापनासाठी हिवरखेड ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर खरेदी केली आहे. तालुक्यात हा पहिलाच प्रयोग आहे.
तालुक्यातील या सर्वांत मोठ्या गावात अनेक वर्षांपासून गावातील घनकचरा कटल्याच्या साह्याने गोळा करण्यात येत होता. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात कचऱ्याची विल्हेवाट लागू शकत नव्हती. परिणामी गावात पाहिजे तशी साफसफाई होऊ शकत नव्हती. या गंभीर समस्येची दखल घेऊन सरपंच विजय पाचारे यांनी शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून ट्रॅक्टर खरेदीसाठी निधी मंजूर करून घेतला व त्या निधीतून गावाच्या विकासासाठी ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला. या ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा २१ जून रोजी पार पडला. यावेळी प्रतिष्ठित नागरिकांनी ट्रॅक्टरचे विधिवत पूजन केले.
हिवरखेड गावातील प्रत्येक घरात कचरा साठवण्यासाठी डस्टबीनच्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे. ट्रॅक्टरने दररोज गावातील घनकचरा जमा करून त्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन जागेवर करण्यात येणार आहे.
----------
ग्रामपंचायतीत येणार रुग्णवाहिका
सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून गावातील जिल्हा परिषद शाळेत २५ बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करून कोविड रुग्णांना दिलासा दिला होता. आता गावातील रुग्ण शहराच्या मोठ्या दवाखान्यात ने आण करण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत रुग्णवाहिकेचा प्रस्ताव शासन प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसात हिवरखेड गावाला रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) उपलब्ध होणार असल्याचे सरपंच पाचारे यांनी सांगितले. गुजरी बाजार चौक येथे पाण्याची फिल्टर मशीन व बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची आरो मशीन बसविण्याचे काम सध्या सुरू आहे.
लोकार्पण सोहळ्याला सरपंच विजय पाचारे, उपसरपंच मंगेश पवार, सदस्य रामेश्वर चव्हाण, राजू गेडाम, आशा पाचारे, आशा दारोकर, जायदाबी शाहीदखाँ, कमल पाचारे, सुनीता अकोलकर, मंगला ठाकरे, कविता वासनकर, नलिनी बघेकर, सुनंदा गावंडे, दिनेश वाघाडे, प्रमोद गणोरकर, सागर घाटोळ, दिनेश होले, संजय काळे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक कैलास बारस्कर, राहुल बिजवे, विजय डेहनकर, नरेश वानखडे, गजानन राऊत, नीलेश रायचुरा, चंद्रशेखर वानखडे, अकील कुरेशी, शकील कुरेशी, सईदखा पठाण, योगेश धोटे, सुशांत निमकर, अमोल बोरवार, श्रावण पाचारे, किसना पाचारे, शेख शकील, रवी भुंते, रामदास भुंते, प्रल्हाद पारधे उपस्थित होते.