रबी पिकाची तयारी सुरू
फोटो - पटोकार २३ पी
पथ्रोट : परिसरातील जवळापूर शिवारात सहा एकर शेतातील उडीद पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतमालकाने ट्रॅक्टर फिरवला.
जवळापूर शिवारातील बाळू भीमराव कडू यांनी खरीप हंगामात सहा एकर क्षेत्रात मुगाची पेरणी केली होती. पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत रासायनिक खते, कीटकनाशकासह २५ हजार रुपये प्रतिएकर असा एकूण दीड लाखांचा खर्च झाला आणि त्याच वेळी खोड पोखरणाऱ्या अळीने घात केला. भविष्यात या पिकातून हाती कवडीही येणार नाही, याची जाणीव झाल्याने सोमवारी बाळू कडू यांनी सहा एकर क्षेत्रातील उडीद पिकावर ट्रॅक्टर फिरवला.
गतवर्षी पीकविम्याची रक्कम आजपावतो मिळाली नाही. लाखोंचे नुकसान झाले तरी शासनाकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा करता येत नसल्याची खंत कडू यांनी व्यक्त केली. आता रबीची तयारी सुरू केल्याचे ते म्हणाले.