बडनेरा : येथील नव्या वस्तीतील बसस्थानकासमोरून जाणाऱ्या मुख्य मार्गालगत मुरुमाचे ढिगारे एक महिन्यापासून तसेच पडून आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ते ढिगारे केव्हा पसरविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डांबरी रस्ता करून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्याच्या दुतर्फा मुरूम टाकला जाणार आहे. मात्र, एक महिन्यापासून मुरुमाचे ढिगारे जैसे थे पडून असल्याने ते केव्हा पसरविणार, असा प्रश्न शहरवासीय तसेच वाहतूकदारांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. हा रस्ता वर्दळीचा आहे. सदर ढिगारे वाहनचालकांसाठी धोक्याचे ठरत आहे. दुचाकीस्वारांना मुरुमाचे ढिगारे अडचणीचे ठरत आहे. या परिसरात पोलीस ठाणे, रुग्णालय, वीज वितरण कार्यालय आहे. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.