शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रस्त्यावर सापडलेली रक्कम वाहतूक पोलिसाने केली ठाण्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:15 AM

पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. मात्र, तेसुद्धा सुहृद आहेत, याचे उदाहरण पोलिसांच्या कृतीतून वेळोवेळी येत असते. शुक्रवारी रस्त्यावर सापडलेल्या दोन हजारांच्या दोन नोटा वाहतूक पोलिसाने कोतवाली ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले.

ठळक मुद्देप्रामाणिकपणा : दुचाकीस्वार दाम्पत्याच्या पडल्या नोटा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. मात्र, तेसुद्धा सुहृद आहेत, याचे उदाहरण पोलिसांच्या कृतीतून वेळोवेळी येत असते. शुक्रवारी रस्त्यावर सापडलेल्या दोन हजारांच्या दोन नोटा वाहतूक पोलिसाने कोतवाली ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले.नावातच ईश्वर असणारे वाहतूक शाखा पश्चिम झोनचे पोलीस नाईक ईश्वर राठोड (ब.न.१३५८) हे शुक्रवारी अतिवर्दळीच्या जयस्तंभ चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावीत होते. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत या वेळेत त्यांना कर्तव्य बजावायचे होते. सायंकाळी ६ वाजता ईश्वर राठोड अस्ताव्यस्त वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत होते. त्याचवेळी त्यांना दुचाकीने पुढे गेलेल्या दाम्पत्याचे पैसे खाली पडल्याचे दृष्टीस पडले. त्यांनी तत्काळ या दुचाकीस्वार दाम्पत्याला आवाज दिला. मात्र, कर्कश्श हॉर्न व वाहनांच्या गोंगाटामुळे त्या दाम्पत्याने लक्ष न देता, दुचाकी पुढे कॉटन मार्केटकडील दीपक चौकाकडे निघून गेली.ईश्वर राठोड हे पैसे पडल्याच्या ठिकाणी गेले असता त्यांना दोन हजारांच्या दोन नोटा दिसल्या. त्यांनी पुन्हा हातवारे करीत दुचाकीवरील दाम्पत्याला जोराजोरात आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचे लक्षच नव्हते. ईश्वर राठोड यांच्या हातात चार हजारांची रोख होती. एखाद्या लोभी व्यक्तीने ती रोख लगेच खिशात घातली असती. मात्र, प्रामाणिक वृत्तीमुळे ते पैसे परत करण्याची भावना ईश्वर राठोड यांच्यातील मनात होती. मात्र, वाहतूक नियंत्रणाचे कार्य सोडून ते पैसे ठाण्यात जमा करण्यासाठी लगेच जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या दाम्पत्याची ड्युटी संपेपर्यंत प्रतीक्षा करीत ही रक्कम आपल्याकडेच ठेवली. अखेर रात्रीचे नऊ वाजले. ड्युटी आटोपून त्यांनी लगेच कोतवाली पोलीस ठाणे गाठले.ठाणेदार दिलीप पाटील यांना भेटून रस्त्यावर चार हजार सापडल्याचे ईश्वर राठोड यांनी सांगितले. यानंतर ती रक्कम ठाण्यात जमा करण्यात आली. ज्या दुचाकीस्वार दाम्पत्याची रक्कम रस्त्यावर पडली, ते दाम्पत्य पोलीस ठाण्यात येईल, त्यावेळी त्यांना पैसे परत मिळावे, ही भावना ठेवून ईश्वर राठोड यांनी ती रोख ठाण्यात जमा केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे ठाणेदार पाटील यांनीही कौतुक केले.पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतात. नागरिकांनी पोलिसांना सौजन्यपूर्ण वागणूक देऊन सहकार्य करायला हवे. जीवनात प्रामाणिकपणाच कामास येते.- ईश्वर राठोड, पोलीस नाईक, वाहतूक शाखा (पश्चिम)

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस