राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, यात अमरावती प्रथम क्रमांकावर राहिले आहे. त्यामुळे ही साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने सुरुवातील १ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतरही रुग्णांची संख्यावाढ पाहता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ८ मार्चपर्यंत त्याची मुदत वाढविली होती. मात्र, जनतेचा आक्रोश बघता जिल्हाधिकाऱ्यांनी ६ मार्चपासून जिल्ह्यात अनलॉकची घोषणा केली. मात्र, त्रिसूत्रीचे पालन आणि प्रतिष्ठानांची वेळ निश्चित करण्यात आली. त्यामुळे शनिवारपासून सर्व दुकाने खुली झाल्याने प्रत्येक चौकातून वाहनांची ये-जा वाढली. परिणामी ट्रॅफिक सिग्नलवर वाहनधारकांचे लक्ष खिळले. मात्र, कॅम्प चौकातील ट्रॅफिक सिग्नल बंदच असल्याने चारही दिशेने एकाचवेळी वाहने सैरावैरा पळताना दिसू लागली. त्यामुळे किंचितही दुर्लक्ष झाल्यास अपघाताची घटना तेथे नाकारता येणार नाही, अशी स्थिती दुपारी ४.४५ वाजता दरम्यान दिसून आली. यासंबंधी वाहतूक पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला असता ते वैद्यकीय रजेवर असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
वाहतूक पोलिसांचे हवे लक्ष
ट्रॅफिक सिग्नल काही तांत्रिक कारणांमुळे बंदही पडू शकतो. म्हणून काय? वाहतूक विस्कळीत होऊ द्यायची काय? त्यावर पर्यायी उपाय म्हणून वाहतूक पोलिसांची तरी नियुक्ती असायला हवी, असे मत बहुतांश वाहनधारकांनी नोंदविले.