शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव येथे हॉटेलमध्ये घुसला ट्रेलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 4:03 PM

चालकाच्या दुर्लक्षामुळे भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये घुसल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे घडली.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान पाच दुचाकीसह ट्रकला उडविले, चालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चालकाच्या दुर्लक्षामुळे भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये घुसल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे घडली. यामध्ये हॉटेलसमोर उभ्या असलेल्या पाच दुचाकीसह हॉटेलचे अंदाजे ५ लाखांचे नुकसान झाले.पुलगावहून कारंजाकडे निघालेला भरधाव ट्रेलर सीजी-जेबी-९८९७ हा तळेगाव दशासरनजिकच्या हायवेवरील गतिरोधकावर नियंत्रित न झाल्याने थेट समोर जात असलेल्या ट्रक क्रमांक जी आर-१२/बीटी ७१५३ ला धडक दिली. यामध्ये संतुलन बिघडल्याने ट्रेलर थेट हॉटेलमध्ये घुसले. हॉलेटसमोर उभ्या असलेल्या एमएच२७ सीएफ-२३४२, एमएच २७ सीएफ-२३४१, एमएच २७ एएन ७२४४, एमएच २७ बीपी २२०५ व एमएच २७ सीएच-९८९१ अशा पाच दुचाकींनाही चिरडले. यामध्ये सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनामादरम्यान पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच तळेगावचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शना एएसआय देऊळकर, जमादार व हायवेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. घटनास्थळाची पाहणी करून ट्रेलरच्या चालविरुद्ध भादंविच्या कमल २७९, ४२७ आणि मोटार वाहन कायदा १८४, १३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. ट्रेलरचालक मात्र पसार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.चौकात दिशादर्शक फलक नसल्याने होताहेत अपघातसुपर एक्सप्रेस हायवेवरील तळेगाव दशासर येथून चोवीसही तास वाहतूक सुरू असते. या चौकातून विविध मार्गावरून बसेस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांसह रोजगारांची गर्दी दिसून येते. त्यांच्या गरजपूर्तीच्या हिशेबाने आजूबाजूला हॉटेलदेखील आहेत. परंतु, येथील गतिरोधकालगत दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वाहने तेथे नियंत्रित करणे अशक्य होऊन अशाप्रकारे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.हा मोठा अपघात असून, सुदैवाने जिवीतहानी टळली. ट्रेलर पोलीस ठाण्यात जमा केला असून, चालकाचा शोध घेत आहे.- गोपाल उपाध्याय,ठाणेदार, तळेगाव दशासर ठाणे

टॅग्स :Accidentअपघात