सहायक नगर रचनाकार, रचना सहायक संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश
अमरावती : राज्याच्या नगर रचना आणि मू्ल्यनिर्धारण विभागाने नियतकालिक बदल्यांचे सत्र आरंभले आहे. त्याअनुषंगाने सहायक नगर रचनाकार, रचना सहायक संवर्गातील ५४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अचानक मोठ्या प्रमाणात झालेल्या या बदल्यांमुळे अनेकांना ‘जोर का झटका धीरे से’ म्हणण्याची वेळ आली आहे.
बदली झालेल्यांमध्ये भा.न. बोरकर (गडचिरोली), वि.भी. मेश्राम (नागपूर), रा.वा. विरमलवार (वर्धा), मि.श्री. नेवारे (चंद्रपूर), न.बा. गिजर (अमरावती), आ.अ. गोगटे (नागपूर), कु.कृ. देशमुख (नागपूर महापालिका), तु.अ. नंद (नागपूर), वि.वि. ढेंगळे (नागपूर), शि.वा. दांडेकर (भंडारा), दा.स. कोळेकर (रत्नागिरी), ह.अं. खंडारे (अमरावती महापालिका), दे.म. मानतकर (अकोला), आ.शे. वानखेडे (अकोला), न.म. बोबडे (यवतमाळ), मा.सु. ढेेपे (औरंगाबाद), सु.वि. मेश्राम (अमरावती), ना.वा. जोशी (सोलापूर), नि.स. देवकते (सोलापूर), प्र.शा. भोसले (औरंगाबाद), तु.ज. मदने (सातारा), ग.तु. शिरसाठ (नाशिक), स्वा.अ. अहिरे (नाशिक), दि.हि. सोनवणे (नाशिक), स.म. साळुंके (नाशिक), ई.अ. पठाण (नंदुरबार), पं.प्र. लाडे (मालेगाव महापालिका), भा.हिं. कुंडले (मिरा भाईंदर महापालिका), दि.ज. मगरे (मुंबई उपनगर), रू.वि. छुटाणी (बृहन्मुंबई), ध.ब. साळुंखे (ठाणे), र.पां. बनसोड (नवी मुंबई), र.आ. पाटील (पालघर), नि.ज. सरोदे (ठाणे महापालिका), ल.स. घंगाळे (कुर्ला), हे.य. पडेलकर (रत्नागिरी), नि.म. जाधव (नवी मुंबई),अ.कि. पटेल (अंधेरी, मुंबई), यो.उ. अट्रावलकर (पुणे), अ.स. कांबळे (पुणे), कि.म.चोपडे (पुणे), आ.रा, कांबळे (पुणे), अ.प्र. गावंडे (कोल्हापूर), र.म. पालीमकर (पुणे), द.ए. साठे (बारामती), श्वे. अ. दारूणकर (पुणे), ह.धों. पाटील (सातारा), सो.मा. गोडसे (पिंपरी, पुणे), अ.अ. महामुनी (पुणे),ने. र. सावंत (पुणे), सा.ग. अली (नागपूर), सं.द. चव्हाण (कोल्हापूर), प्र.आं. बास्टेवाड (पुणे), द.शं. तरोडे (अलिबाग) यांचा समावेश आहे.