अमरावती; जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद सोमवार २६ जुलै पासून बदल्यांचा हंगाम सुरू होणार आहे. सार्वत्रिक बदली प्रक्रिया बाबतचे आदेश १९ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केले आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्ग वगळता गट क व गट ड संवगार्तील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले असून कोरोना नियमावलीचे पालन करत बदल्यांची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या बदल्यांसाठी गत १९ जुलै पासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तत्पूर्वी म्हणजेच २० जुलै पर्यत खाते प्रमुखांनी तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी संवर्गनिहाय वास्तव्य जेष्ठता यादी जिल्हास्तरीय कार्यालयाकडे पाठवावी अशी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सेवा ज्येष्ठता याद्या १६ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर यादीवर २२ जुलै रोजी आक्षेपकावर सुनावणी घेवून निराकरण करून अंतिम जेष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर २६ ते २८ जुलै या कालावधीत जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह समुपदेशन पद्धतीने विभागनिहाय बदल्यांची प्रक्रिया पार पडणार आहे.
बॉक्स
अशा होणार बदल्या
बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी पशुसंवर्धन विभाग सिंचन विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग बांधकाम विभाग कृषी विभाग वित्त विभाग महिला व बालकल्याण विभाग २७ जुलै रोजी पंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्ग वगळून, २८ जुलै रोजी आरोग्य विभागातील बदल्यांची प्रक्रिया केली जाणार आहे.जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या प्रशासकीय विनंती अशी या प्रमाणे बदल्यांची प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली व संबंधित खाते प्रयोगांच्या उपस्थितीत पार पडणार आहे