शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आरएफओंच्या बदल्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’; पण मलईदार जागा रिक्तच

By गणेश वासनिक | Published: August 31, 2024 6:34 PM

राज्यात पहिल्यांदाच वनवृत्तनिहाय बदल्यांची यादी जाहीर : ‘विनंती’ बदल्यांमध्ये गेम होण्याचे संकेत

गणेश वासनिक

अमरावती : राज्याच्या महसूल व वनविभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच ११९ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी शुक्रवारी वनवृत्तनिहाय जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत वनविभाग आरएफओंच्या बदल्यांची यादी राज्यस्तरावर जाहीर करीत होते. मात्र, शासनाने यंदा बदल्यांची यादी सर्कलनिहाय प्रसिद्ध करून नेमके काय साध्य केले, हे कुणालाही कळू शकले नाही; परंतु यात काहींनी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार केले; पण त्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली नाही. त्यामुळे आरएफओंमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र दिसून येत आहे.

वनवृत्तनिहाय रिक्त असलेल्या मलईदार जागा■ कोल्हापूर वनविभाग : मलकापूर, वाई (सातारा वनविभाग), जत (सांगली), कणकवली, आंबोली व सावंतवाडी.■ छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर, भूम, लातूर विशेष कार्य.■ गडचिरोली वनवृत्त : वडसा, कुरखेडा, आरमोरी, अहेरी, मार्कंडा कनसोबा.■ ठाणे वनवृत्त : येवूर वन्यजीव, पनवेल, बदलापूर रिक्त.■ नाशिक वनवृत्त : भंडारदरा वन्यजीव, हरिश्चंद्र वन्यजीव.■ पुणे वनवृत्त : भांबुर्डा, वडगाव मावळ, पौंड, खेड राजगुरूनगर, मनचर ओतूर, सासवड, नरसापूर.

आरएफओंच्या ‘विनंती’ बदल्यांमध्ये ‘फिक्सिंग’वनविभागात शुक्रवारी आरएफओंच्या प्रशासकीय बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता खऱ्या अर्थाने आरएफओंच्या ‘विनंती’ बदल्यांमध्ये मोठे ‘अर्थ’पूर्ण राजकारण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी ‘विनंती’च्या आरएफओंनी मलईदार जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, अमरावती, यवतमाळ वनवृत्त या बाबीला अपवाद ठरले आहे. मेळघाटमधील बदलीपात्र आरएफओंवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती