अमरावती : भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीबाबतचे आदेश राज्याच्या महसूल व वन मंत्रालयाने मंगळवारी जारी केले आहे. एकूण १२ वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना बदलीने पदोन्नती आणि पदस्थापना देण्यात आली आहे. यात ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एस.व्ही. रामाराव यांनी मुंबई येथे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. ठाणे येथील वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) के. प्रदीपा यांना ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक़ (प्रादेशिक) येेथे रिक्त पदी पदोन्नती मिळाली आहे.
अमरावतीचे वनसंरक्षक जी.के. अनारसे यांना मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती, उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांना ठाणे (कार्य आयोजना), यवतमाळचे उपवनसंरक्षक आनंद रेड्डी येल्लु यांची नागपूर, सहायक वनसंरक्षक एन. जयकुमारन यांची अकोट (वन्यजीव) येथे उप वनसंरक्षक म्हणून पदस्थापना, गडचिरोली वन विभाग अंतर्गत धानोरा येथील सहायक वनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांची यावल (प्रादेशिक) उप वनसंरक्षक, पांढरकवडा येथील सहायक वनसंरक्षक अग्रीम सैनी यांची नाशिक येथे महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकपदी, सहायक वनसंरक्षक भुक्या नरसिंम्हा स्वामी हे भंडारा येथील महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, वडसा येथील सहायक वनसंरक्षक धनंजय कुंडलिक यांची यवतमाळ (प्रादेशिक) येथे उप वनसंरक्षकपदी, वाशिम येथील सहायक वनसंरक्षक शैलेश मिना यांची गडचिरोली येथील उपवनसंरक्षक तर, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक अभिजीत वायकोस यांची वाशिम येथे उपवनसंरक्षकपदी पदस्थापना करण्यात आली आहे. बदली, पदोन्नती वा पदस्थापनेच्या जागी आदेशानंतर त्वरेने रूजू व्हावे, असे आदेश मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) मल्लीकार्जुन जी. यांच्यास्वाक्षरीने निर्गमित झाले आहे.