अमरावती: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सर्व शासकीय रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व २० उपकेंद्राच्या बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. यासाठी आशियाई बँक व राज्य सरकारकडून आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे आरोग्य संस्थाचा कायापालट होणार आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून शासनाकडे जिल्ह्यातील आरोग्य केंद्र उपकेंद्राची यादी पाठविण्यात आली होती.यानुसार शासनाकडून याकरीता लवकरच निधी मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाला आशियाई बँकेकडून एकूण ७० टक्के प्रमाणात कर्ज उपलब्ध होणार आहे यातील ३० टक्के रक्कम राज्य शासन आरोग्य संस्थांच्या बळकटी करण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. कर्ज व राज्य शासनाचा हिस्सा दोन्ही मिळून जिल्ह्याला कोटयावधीचा निधी आरोग्य संस्थाना बळकटीकरणासाठी शासनाचे माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
बॉक्स
विविध कामे होणार
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून आशियाई बँकेच्या कर्जाची रक्कम व स्वहीस्सा या माध्यमातून शासकीय आरोग्य संस्थांच्या बळकटी करण्याचे धोरण हाती घेण्यात आले कर्ज व राज्य शासनाच्या हिस्सा या माध्यमातून यासाठी पुरेसा निधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला उपलब्ध होणार आहे या मधून आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या बांधकाम यंत्रसामुग्री उपकरणे खरेदी वन्य मनुष्यबळ सुविधांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बॉक्स
ही आहेत आरोग्य
चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी, सर्फाबाद, अचलपूर -कांडली, वरूड - बेनोडा शहीद, भातकुलीतील गणोरी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.
बॉक्स
या आरोग्य उपकेंद्राचा समावेश
जिल्ह्यातील उपकेंद्रामध्ये चांदुर बाजार तालुक्यातील थुंगाव पूर्णा,जसापुर, दहिगाव पूर्णा, फुबगाव, तिवसा-वणी ममदापुर, बोर्डा, वरूड मधील तिवसा घाट, जामगाव खडका, सावंगा, जामगाव महेंद्री, मोर्शी मधील दापोरी, येरला, अंजनगाव सुर्जीतील जवर्डी, खोडगाव, खिराडा, नांदगाव खंडेश्वर मधील कंझरा, ओंकारखेडा, फुबगाव, शिवनी, चिखलदरा मधील सावरपाणी आदी उपकेंद्रांना बांधकामासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
बॉक्स
अशी होणार कामे
आराेग्य केंद्र,उपकेंद्रामध्ये उपलब्ध होणाऱ्या निधीतून बांधकामे,संरक्षण भिंती,शासकीय निवासस्थान बांधकाम, अंतर्गत रस्ते,फर्निचर,यंत्रसामुग्री- उपकरणे खरेदी करणे,पाणी व विजेची साेय करणे अशा प्रकारची कामे करता येणार आहेत.